विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अटकेनंतरही आपल्या पदावर चिकटून राहून तुरुंगातून सरकार चालवणार. पण तुरुंगातून सरकार नव्हे, तर गुंडांच्या गॅंग चालतात, अशा शब्दांमध्ये भाजपच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्यावर शरसंधान साधले आहे. BJP slams Arvind Kejriwal AAP Gangs run from jail not government
दिल्लीच्या दारू घोटाळ्यात आणि मनी लॉन्ड्रीग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना 28 मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश राऊज कोर्टाने दिले. त्यानुसार केजरीवाल सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पण त्या कोठडीतूनच त्यांनी आपल्या समर्थकांसाठी एक निवेदन जारी करून आपण तुरुंगातूनच सरकार चालवू, असे सांगितले.
इतकेच नाही, तर स्वातंत्र्यसैनिकाचा आव आणत दिल्लीच्या जनतेसाठी संदेश देखील प्रस्तुत केला. तो त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी वाचून दाखविला. त्यात देखील त्यांनी तुरुंगातूनच सरकार चालवण्याचा इरादा व्यक्त करून आपण लवकरच तुरुंगातून बाहेर येऊ, असा आशावादही व्यक्त केला. पण केजरीवालांची ईडीच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर सीबीआय केजरीवालांचा ताबा घेणार आहे. त्यामुळे ते तुरुंगातून लवकर बाहेर येण्याची शक्यता नाही, तरी देखील केजरीवालांनी तुरुंगातूनच सरकार चालवण्याचा “निर्धार” व्यक्त केला.
केजरीवालांच्या या “निर्धारावरच” भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले. तुरुंगातून सरकार चालवता येत नाही, तर गुंड माफियांच्या गॅंग चालवल्याच्याच बातमी येतात. मग केजरीवाल त्यांची गॅंग तुरुंगातून चालवणार आहेत का??, असा तिखट सवाल दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनी केला. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जरी दिल्लीत गदारोळ केला असला, तरी प्रत्यक्षात दिल्लीच्या जनतेने फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केल्याचे मनोज तिवारी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App