विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भूतानने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द ड्रक ग्याल्पो’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय म्हणून माझ्या आयुष्यातील आजचा दिवस मोठा आहे. तुम्ही मला भूतानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. प्रत्येक पुरस्कार हा स्वतःमध्ये खास असतो, पण जेव्हा एखादा पुरस्कार दुसऱ्या देशाकडून मिळतो, तेव्हा आपले दोन्ही देश योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचा आत्मविश्वास दृढ होतो. हा सन्मान माझी वैयक्तिक उपलब्धी नसून भारताचा आणि १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे.Bhutan gives Prime Minister Modi the Order of the Druk Gyalpo its highest civilian honour.
भारत आणि भूतानच्या तरुणांच्या आकांक्षा आणि ध्येय समान आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भूतानच्या या महान भूमीत मी सर्व भारतीयांच्या वतीने हा सन्मान नम्रपणे स्वीकारतो आणि या सन्मानासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. भारत आणि भूतानमधील संबंध जितके प्राचीन आहेत तितकेच नवीन आणि समकालीन आहेत. 2014 मध्ये मी भारताचा पंतप्रधान झालो तेव्हा माझी पहिली परदेश भेट म्हणून भूतानला जाणे स्वाभाविक होते. 10 वर्षांपूर्वी भूतानने केलेले स्वागत आणि आपलेपणा यामुळे पंतप्रधान म्हणून माझ्या भेटीची सुरुवात संस्मरणीय ठरली. भारत आणि भूतानच्या तरुणांच्या आकांक्षा आणि उद्दिष्टे सारखीच आहेत.
भारताने 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तर भूतानने 2034 पर्यंत उच्च उत्पन्नाचा देश बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, BB म्हणजेच ब्रँड भूतान आणि भूतान बिलीव्ह या दोन्हींना यशस्वी करण्यासाठी भारत प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत उभा आहे. सहकार्यासोबतच आम्ही एकमेकांचे यशही साजरे करतो. भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली, तेव्हा भारतातील लोकांइतकाच भूतानच्या लोकांनाही आनंद झाला होता. आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आजची उपलब्धी पुढे नेण्यासाठी आम्ही अमृतकालची २५ वर्षांची प्रतिज्ञा घेतली आहे.
पंतप्रधान म्हणाले की, लवकरच आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. भूतान आमच्या प्रवासात एक मजबूत भागीदार असेल. एक भारतीय म्हणून माझ्या आयुष्यातील आजचा दिवस खूप मोठा आहे. तुम्ही मला भूतानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा सन्मान माझी वैयक्तिक उपलब्धी नसून भारताचा आणि १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App