वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बदायूँ मध्ये सलून चालविणाऱ्ये साजिदने सलून समोरच राहणाऱ्या कुटुंबातील दोन लहान मुलांची धारदार वस्तऱ्याने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला पण पोलिसांनी काही वेळातच साजिदला शोधून काढून त्याचा एन्काऊंटर केला. sajid says work completed after murder of ayush and aahan in badaun
साजिदने पूर्व वैमनस्यातून दोन संख्या लहान भावांची हत्या केली. तिसऱ्या भावाला जखमी केले. गुन्हा केल्यानंतर आरोपी साजिदने घरी येऊन “काम तमाम केले”, असे त्याच्या आईला सांगितले आणि तो घरातून पळाला. तो बदायूँच्या नाक्यावर पोहोचला होता, तिथेच पोलिसांनी त्याचे एन्काऊंटर केले. यामुळे बदायूँ मध्ये मोठा तणाव आहे. काही ठिकाणी तोडफोड, आगी लावण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. तणाव पाहून अनेक ठिकाणी पोलीस फोर्स तैनात करण्यात आली आहे.
सिविल लाइन क्षेत्राच्या बाबा कॉलनीमध्ये हत्येची ही घटना घडली. या कॉलनीमध्ये साजिद सलून चालवायचा. कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका माणसाचा सोमवारी साजिद बरोबर वाद झाला होता. तेव्हापासून साजिदच्या मनात राग धुमसत होता. ज्याच्या बरोबर वाद झालेला, तो व्यक्ती मंगळवारी संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर गेला होता. पत्नी ब्युटी पार्लरमध्ये होती. तीन मुले घरात होती.
घरातल दृश्य पाहून सगळेच स्तब्ध
संधी साधून साजिद घरात घुसला. त्याने वस्तरा चालवून दोन सख्ख्या भावांची हत्या केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने तिसऱ्या मुलावर सुद्धा हल्ला केला होता. पण तो गंभीर जखमी झाला. गुन्हा केल्यानंतर साजिद तिथून पळाला. हे कॉलनीच्या लोकांनी पाहिले, तेव्हा त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. कॉलनीच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. ते घराच्या आता गेले. तिथले दृश्य पाहून स्तब्ध झाले. दोन भावाचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्या पडलेले होते. संपूर्ण खोलीत रक्त होतं. गंभीर जखमी अवस्थेतील मुलाला रुग्णालयात दाखल केले. मुलांची आई घरी येऊन समोरचे दृश्य पाहून तिने हंबरडाच फोडला. हे सर्व पाहून तिथे जमा झालेल्या लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला.
नाक्यावर मृतदेह ठेवून ट्रॅफिक जॅम
लोकांनी साजिदचे सलून पेटवून दिले. त्यानंतर नाक्यावर मृतदेह ठेवून ट्रॅफिक जॅम केले. पोलीस घटनास्थळी पोहोचले, ते लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. DM-SSP म्हणणेही लोक ऐकत नव्हते. ही बातमी संपूर्ण शहरात पसरताच तणाव निर्माण झाला. काही वेळातच आरोपी साजिद पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याची बातमी आली. त्यानंतर नातेवाईकांनी मुलाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. घरापासून काही अंतरावरच साजिदला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये संपविले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App