वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक जाहीर करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची तारीख 4 जून 2024 असे आधी जाहीर केली होती. परंतु आता त्यात बदल करून सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांची मतमोजणी 4 ऐवजी 2 जून रोजी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. Election Commission of India changes the counting schedule of Arunachal Pradesh and Sikkim from June 4 to June 2
सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या विधानसभांच्या मुदती 2 जून 2024 रोजी संपत आहेत. त्यामुळे त्याच दिवशी दोन्ही राज्यांच्या नव्या विधानसभा अस्तित्वात आल्या पाहिजेत, या हेतूने 4 ऐवजी 2 जून रोजी विधानसभा निवडणुकांची मतमोजणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
Election Commission of India changes the counting schedule of Arunachal Pradesh and Sikkim from June 4 to June 2. pic.twitter.com/t53RwnCth5 — ANI (@ANI) March 17, 2024
Election Commission of India changes the counting schedule of Arunachal Pradesh and Sikkim from June 4 to June 2. pic.twitter.com/t53RwnCth5
— ANI (@ANI) March 17, 2024
2024 च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा करताना केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतमोजणीची तारीख 4 जून 2024 अशी यादी जाहीर केली होती. त्याच दिवशी लोकसभेच्या सर्व आणि 4 राज्यांच्या विधानसभांच्या सर्व जागांचे निकाल जाहीर होणार होते. परंतु फक्त सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या दोन विधानसभांच्या निवडणुकांची मतमोजणी 2 जून रोजी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App