भारतीय नौदल 17 बांगलादेशी नागरिकांसाठी सरसावले, समुद्राच्या मध्यात यशस्वी केले खास ‘ऑपरेशन’

आपल्या कारवाईने 35 समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतीय नौदल वेळोवेळी आपली ताकद दाखवत असते. आज नौदल सागरी जगतात आपल्या शक्तीचा झेंडा फडकवत आहे. त्यामुळेच समुद्रातील शत्रूही भारतीय नौदलाला घाबरतात. याचे ताजे उदाहरण कोलकाता येथून समोर आले आहे, जिथे नौदलाने 17 बांगलादेशींची चाच्यांपासून सुटका केली आहे.Indian Navy rescued 17 Bangladeshi nationals from pirates

नौदलाने कोलकाता येथील सागरी भागात एक मोठे यशस्वी ऑपरेशन केले आहे. भारतीय युद्धनौका आयएनएस कोलकाताने आपल्या कारवाईने 35 समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. हे ऑपरेशन 40 तास चालले आणि 17 बांगलादेशींचे प्राण वाचले.



आयएनएस कोलकाता ने आपल्या किनारी भागापासून सुमारे 2600 किमी दूर ऑपरेशन सुरू केले आणि समुद्री चाच्यांवर हल्ला केला. सर्व समुद्री चाच्यांना नौदल शक्तीला शरण जावे लागले. नौदलाने सर्व 17 बांगलादेशी नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. हे ऑपरेशन पार पाडण्यासाठी भारतीय नौदलाने INS सुभद्रा, High Altitude Long Endurance Drone, P8I मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट, मार्कोस प्रहार आणि C-17 विमानांचा वापर केला.

मिळालेल्या माहितीनुसार, चाच्यांनी एमव्ही अब्दुल्ला हे बांगलादेशी जहाज हिंदी महासागरात ताब्यात घेतले होते. बांगलादेशी व्यापारी जहाज अब्दुल्ला हे मोझांबिकहून संयुक्त अरब अमिरातीकडे जात होते. दरम्यान, चाच्यांनी जहाजावर हल्ला केला. जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी भारतीय नौदलाला मिळताच ते तत्काळ ॲक्शन मोडमध्ये आले.

Indian Navy rescued 17 Bangladeshi nationals from pirates

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात