रोहित पवारांच्या तोंडी भाजपच्या कमळाची “स्तुती”; शिंदे + अजितदादांच्या आमदार + खासदारांची कमळावर लढण्याची तयारी!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाची रस्सीखेच सुरू असताना त्या जागावाटपाकडे लक्ष द्यायचे सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी महायुतीमध्ये लक्ष घालण्याच्या उचापती चालवले आहेत पण त्या उचापती करतानाच नकळत रोहित पवारांच्या तोंडी भाजपच्या कमळाची स्तुती आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या घडामोडींवर टीका करताना अप्रत्यक्षपणे रोहित पवारांनी “कमळ आवडे सगळ्यांना” याचीच कबुली देऊन टाकली!! Rohit pawar admits BJP’s lotus brand increasing and pawar brand decreasing in maharashtra

रोहित पवार म्हणाले

  • अजित पवार गटाच्या 22 आमदारांना शरद पवारांकडे परत यायचे आहे, तर 12 आमदारांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे असे वाटते आहे. लोकसभेच्या जागावाटपात अजित पवारांना अपेक्षित जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात वाद होणारच होता. त्याबरोबरच भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात देखील वाद सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात मोठी खदखद असून, बऱ्याच लोकांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढायची आहे.
  • अजितदादांच्या पक्षातील 12 आमदारांना देखील भाजपच्या कमळ चिन्हावरच लढायचे आहे, तर 22 आमदारांना पुन्हा एकदा शरद पवारांकडे परत यायचे आहे. त्यामुळे हा वाद हळूहळू वाढत जाणार असून यात एकनाथ शिंदे यांच्यासह अजितदादांच्या पक्षाचे नुकसान होणार आहे.
  • अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं, एक मोठा नेता, लोकांच्या मनातील लोकमत असलेला हा कुठेतरी भाजपने राजकीय दृष्ट्या संपवला आहे. कारण भाजप नेत्याला जवळ करतो आणि संपवून टाकतो. राजकीय पक्षांना जवळ करतो आणि संपवून टाकतो. पण ते एवढ्या लवकर होईल हे माहिती नव्हते. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना 9 जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु 9 ऐवजी आता त्यांना 4 जागांवरच आनंद साजरा करावा लागणार आहे. लोकसभेत अशी परिस्थिती असेल तर कदाचित विधानसभा निवडणुकीत घड्याळावर कोणीच उभे राहणार नाही. अजितदादांचे सर्वच समर्थक भाजपच्या कमळ चिन्हावर उभे राहतील. 12 आमदार अजित दादांना थेट भाजपमध्ये जायलाच सुचवत आहेत.

रोहित पवारांच्या वर उल्लेख केलेल्या सगळ्या वक्तव्याचा अर्थ असाच होतो की, आजही महाराष्ट्रात भाजप हाच सर्वांत मोठा पक्ष आहे किंबहुना आपल्याला निवडून यायची खात्री हवी असेल, तर बहुसंख्य आमदारांना भाजपचे कमळ चिन्ह वापरावे लागणार आहे. कारण त्या चिन्हावरच जनमताचा मोठा पाठिंबा मिळवून विजयाची खात्री देता येऊ शकणार आहे, जी खात्री रोहित पवारांच्या पक्षाचे तुतारी चिन्ह वाजवून मिळणार नाही किंवा अजितदादांच्या घड्याळ चिन्हावरही निवडून येण्याची खात्री नाही. रोहित पवारांच्या वक्तव्याचा गर्भित अर्थ असा आहे की, पवार नावाचा ब्रँड अस्तंगत होऊ घातला आहे.

Rohit pawar admits BJP’s lotus brand increasing and pawar brand decreasing in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात