दिव्यांगांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न – फडणवीस

नागपूर सुधार प्रन्यास तर्फे पारडी येथे दिव्यांगांकरीता उभारण्यात आलेल्या अनोख्या ‘अनुभुती इन्क्लुझिव्ह पार्क’चे लोकार्पण


विशेष प्रतिनिधी

नागपूर : दिव्यांगांचे मनोरंजन व प्रशिक्षण डोळ्यांसमोर ठेवून नागपूर सुधार प्रन्यास तर्फे पारडी येथे दिव्यांगांकरीता उभारण्यात आलेल्या अनोख्या ‘अनुभुती इन्क्लुझिव्ह पार्क’चे लोकार्पण व पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.Govts effort to connect the disabled with the mainstream of society by making them selfreliant Fadnavis

कार्यक्रमात ‘राईट टू सर्व्हिस’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अनुभुती इन्क्लुझिव्ह पार्कच्या उभारणीचे काम नागपूर सुधार प्रन्यास (NIT) च्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. यावेळी पार्कच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्याचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. हे पार्क उभारण्यासाठी 14 कोटी खर्च करण्यात आले आहेत.



या आधुनिक उद्यानात दिव्यांगांसाठी मनोरंजन आणि प्रशिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये दृष्टिहीन लोकांसाठी टच व स्मेलिंग गार्डन, श्रवणदोषांसाठी सांकेतिक भाषा निर्देशांक, लुडो, बुद्धिबळ, सापसिडी व इतर खेळ उपलब्ध, ओपन थिएटर आणि दृष्टिहीन व्यक्तींसाठी स्पर्शिका मार्ग, बौद्धिकदृष्ट्या आव्हान असलेल्या मुलांसाठी सेंसारी इंटीग्रेशन प्रिंट, नक्षत्र वाटिका, कारंजे, जायलोफोन आणि पक्षांच्या आवाजासह म्युझिक थेरपी, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपी, क्लास रूम, वॉटर ॲक्टिविटी, किचन-कँटिन इत्यादी सुविधा असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिव्यांगांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी 2016 मध्ये ‘दिव्यांग हक्क कायदा’ मंजूर करण्यासोबतच अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे अपंगांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळाला. राज्य सरकारने आता मोठ्या प्रमाणात भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत दिव्यांगांना आरक्षण ठेवून नोकरीमध्ये कशा प्रकारे सामील करता येईल याबाबत प्रयत्न केले जात आहेत. दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना या पार्कमध्ये येता यावे यासाठी त्यांच्या वाहन व्यवस्थेकरिता DPDC तून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. असं यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

Govts effort to connect the disabled with the mainstream of society by making them selfreliant Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात