संदेशखळीच्या महिलांनी बारासात गाठून बंगाल पोलिसांवर अनेक आरोप केले.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी येथील बारासात भागात सभा घेऊन राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.People who reached the Prime Ministers rally were stopped by the police Sandeshkhali womens allegation
सकाळपासूनच पंतप्रधान मोदी संदेशखळी येथील पीडित महिलांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, संदेशखळीच्या महिलांनी बंगाल पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. पंतप्रधानांच्या रॅलीच्या मैदानावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखले, असे त्यांनी म्हटले आहे.
संदेशखळीच्या महिलांनी बारासात गाठून बंगाल पोलिसांवर अनेक आरोप केले. आम्हाला पोलिसांनी अडवले, असे महिलांनी सांगितले. मैदानावर पोहोचण्यापूर्वीच आम्हाला थांबवण्यात आल्याची माहिती महिलांनी दिली. आमच्या बसेस ठिकठिकाणी थांबवण्यात आल्याचे महिलांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App