ममतांशी मतभेदांचा गंभीर परिणाम; अशोक चव्हाणांनंतर अधीर रंजन चौधरी देखील भाजपच्या वाटेवर??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधल्या अंतर्गत राजकारणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या गंभीर मतभेदांना फटका काँग्रेस संघटनेला बसणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ अधीर रंजन चौधरी पक्षातून फुटण्याच्या बेतात आहेत.serious consequences of disagreements with Mamata; After Ashok Chavan, Adhir Ranjan Chaudhary is also on the way to BJP??

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. पण आता तृणमूळ काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये डील होण्याची शक्यता दिसते. ही डील झाल्यास पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी पक्षाची साथ सोडू शकतात.



अधीर रंजन चौधरी यांची नाराजी ममता सरकारसाठी नवीन नाही. पश्चिम बंगालच्या प्रत्येक समस्येवर ते ममता बॅनर्जी यांना घेरतात. अशावेळी टीएमसी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा करार झाल्यास अधीर रंजन चौधरी पक्ष सोडणार का?? काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते नाराज असल्याच काहींनी मान्य केले. पण हायकमांड त्यांची समजूत काढेल, असही काही नेत्यांचे मत आहे.

त्यांना काय टाळायच आहे?

अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातल एक मोठ नाव आहे. आज नाही, मागच्या अनेक वर्षांपासून ते विरोधी पक्षनेते म्हणून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींशी लढतायत. लोकसभेसाठी बोलणी यशस्वी झाल्यास त्यांना टीएमसी नेत्यांसोबत मंचावर याव लागेल. ममता सरकारबद्दल आपली भूमिका सौम्य करावी लागेल. अधीर रंजन चौधरी यांना हे टाळायचे आहे.

आघाडीला विरोध का?

तृणमुलशी आघाडी झाल्यास काँग्रेसला कमी जागा मिळणार हे अधीर रंजन चौधरी यांना माहिती आहे. त्यामुळे अशी आघाडी त्यांना मान्य नाही. अधीर रंजन चौधरी यांच्या बेरहामपूरच्या जागेवरुनही दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत.

काँग्रेसला किती टक्के मते मिळाली??

पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूळच 42 पैकी 22 आणि भाजपाने 18 जागांवर विजय मिळवला होता. डाव्या पक्षांना एका जागेवर विजय मिळाला होता. टीएमसीला त्या निवडणुकीत 44 % मते मिळाली होती. भाजपाला 41 % मते मिळाली होती. काँग्रेस पक्षाला 2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये 6 % मत मिळाली होती.

serious consequences of disagreements with Mamata; After Ashok Chavan, Adhir Ranjan Chaudhary is also on the way to BJP??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात