शिंदे – फडणवीस सरकारच्या मराठा आरक्षणाचे संभाजीराजेंकडून स्वागत; पण जरांगेंनी आरक्षण आणि उपचार घेणेही नाकारले!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या 10 % आरक्षणाचे माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी आज स्वागत केले. परंतु मनोज जरांगे पाटलांनी त्या आरक्षणाचे आधी स्वागत केले, पण नंतर ते नाकारले. त्यांनी उपोषण आंदोलन सुरू ठेवले असून आता सलाईन काढून टाकून उपचार देखील घेणे नाकारले आहे.Sambhaji Raj welcomes Shinde-Fadnavis government’s Maratha reservation; But the Jarangs refused to take reservation and treatment too!!



शिंदे – फडणवीस सरकारने मांडलेले मराठा आरक्षण विधेयक आज विधिमंडळाने एकमताने मंजूर केले. याचे संभाजी राजे छत्रपती यांनी स्वागत केले. सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे. शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे यासाठी मी गेले दोन वर्षे पाठपुरावा करत होतो. आता सरकारने मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे. आता तो कायदा त्यांनी कोर्टामध्येही टिकवावा, असे आवाहन संभाजी राजे यांनी केले.

मात्र जरांगे पाटलांनी सुरुवातीला या मराठा आरक्षणाचे स्वागत केले, पण नंतर ते आरक्षण नाकारले. सरकारने दिलेल्या दिलेल्या आरक्षणाचे स्वागत आहे. पण हे आरक्षण आम्हाला मान्य नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. उद्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबतची बैठक बोलावली आहे. सगळ्या मराठा बांधवांनी अंतरवली सराटीमध्ये या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मनोज जरांगे काय म्हणाले?

मराठा आरक्षणाबाबतचं विधेयक मंजूर झालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हे विधेयक मंजूर करणं आमच्या हिताचं नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. या विधेयकाला विरोध करतानाच मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मराठा समाजासाठी त्यांचा मुलगा म्हणून मी काम करतो आहे. त्यांच्यासाठीच लढत राहणार, असं मनोज जरांगे म्हणाले. यावेळी हाताला असलेली सलाईन त्यांनी काढून टाकली. मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोवर उपचार घेणार नसल्याचं जरांगे म्हणाले.

निर्णयाचं स्वागत पण…

आम्ही इथून आधीही स्वागत केले होते. आताही स्वागत करतो. आमचे म्हणणे आहे. आमच्या हक्काचे आरक्षण द्या. सगे सोयरेची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. आधीही सांगितलं होतं की हे नाकारण्याचा काही कारणच नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आज जे विधेयक मंजूर झालं, त्याचं आम्ही त्यासाठी आताही स्वागतच करतो. यात पोरांचे काही कल्याण होणार नाही. आमची हक्काच्या ओबीसीमधील आरक्षणाची मागणी आहे. त्याची अंमलबजावणी पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत, असे जरांगे म्हणाले.

उद्या अंतरवलीत बैठक

उद्या दुपारी 12.00 वाजता अंतरवलीत बैठक होणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी यावे. शक्यतो सर्वांनीच यावे. उद्या आंदोलनाची दिशा ठरवू. घाई गडबड नाहीच आहे ना. हरकती साठी यंत्रणा आहे. आणखी मनुष्यबळ वाढवा. आमची आणि त्यांची वैयक्तिक काही दुश्मनी नाहीये. आमचे एवढेच म्हणणे आहे की, त्यांनी आज त्या मागणीवर निर्णय घ्यायला पाहिजे होता. ज्यासाठी आक्रोश करतोय त्या माता माऊलींची चेष्टा करत आहात?? सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Sambhaji Raj welcomes Shinde-Fadnavis government’s Maratha reservation; But the Jarangs refused to take reservation and treatment too!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात