वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मद्य धोरणाच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. समन्सचे पालन न केल्याच्या ईडीच्या तक्रारीवरून दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना समन्स बजावत १७ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे.ED summons avoided, but Kejriwal summoned by court; Delhi Chief Minister ordered to appear on February 17
अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट दिव्या मल्होत्रा यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी ते समन्सचे पालन करण्यास कायदेशीररीत्या बांधील होते आणि तपास यंत्रणेसमोर हजर राहू शकले नाहीत. केजरीवाल समन्स बजावल्यानंतही हजर राहत नसल्याचे ईडीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
ईडीने कोर्टाला सांगितले, सोरेन यांनी सत्तेचा दुरुपयोग केला
ईडीने बुधवारी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांचे निकटवर्ती यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटचे रेकॉर्ड सादर केले. यात कथितरीत्या राज्य अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांशी संबंधित माहितीच्या “मोठ्या रकमेची” चर्चा करण्यात आली.
पाच दिवसांची कोठडी संपल्यानंतर ईडीने सोरेन यांना न्यायालयात हजर केले. ईडीने म्हटले आहे की, सोरेन यांनी सत्तेचा दुरुपयोग केला. न्यायालयाने सोरेन यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App