पंतप्रधान मोदींनी आसामला दिली ११ हजार कोटींची भेट

येथील प्रेमच माझा विश्वास असंही मोदींनी म्हटलं आहे.


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : पंतप्रधान मोदी आज आसाममध्ये आहेत. पंतप्रधान मोदींनी आज आसामला ११ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प भेट दिले. यावेळी मोदी म्हणाले, “११ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनामुळे आसाम आणि ईशान्येचा दक्षिण आशियातील इतर देशांशी संपर्क मजबूत होईल. या प्रकल्पांमुळे पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील…”Prime Minister Modi gave a gift of 11 thousand crores to Assam



याशिवाय मोदींनी कामाख्या ऍक्सेस कॉरिडॉरची पायाभरणी केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. तसेच आसामचे प्रेम हा माझा विश्वास आहे, असंही मोदींनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आपली तीर्थक्षेत्रे, आमची मंदिरे, आमची श्रद्धास्थाने, ही केवळ भेट देण्याची ठिकाणे नाहीत. ही आपल्या संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या प्रवासाची अमिट चिन्हे आहेत. हा भारत संकटाचा सामना करताना मजबूतीने कसा उभा राहिला आहे याचा पुरावा आहे. .”

Prime Minister Modi gave a gift of 11 thousand crores to Assam

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात