वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेने इराणचे ड्रोन, क्षेपणास्त्र निर्मितीचे समर्थन करणाऱ्या संस्थांवर निर्बंध लावले. इराणनिर्मित ड्रोन अतिरेकी कारवायासाठी याचा उपयोग करतात. हुती बंडखोरांनीही इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा वापर करून अमेरिकी नौदलावर हल्ला केला आहे.US airstrikes on 85 locations in Iraq-Syria; 18 dead, response to attack on US base
एखाद्या अमेरिकीस नुकसान पोहोचल्यास उत्तर देऊ : बायडेन
राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले, अमेरिकी नागरिकास नुकसान पोहोचल्यास आम्ही उत्तर देऊ. आमची प्रतिक्रिया आज सुरू झाली. ही जारी राहील.
अमेरिकेने इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि इराण समर्थित बंडखोर गटांविरोधात इराक आणि सीरियात ८५ ठिकाणांवर हवाई हल्ले केले. ही जॉर्डनमध्ये अमेरिकी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या प्रत्युत्तराची कारवाई आहे. सीरियावर निगराणी ठेवणाऱ्या ब्रिटनच्या गटानुसार, हल्ल्यात इराण समर्थित समूहांचे कमीत कमी १८ सदस्य मारले गेले. इराक सरकारने सांगितले की, हल्ल्यात नागरिकांसह १६ लोक ठार आणि २५ अन्य जखमी झाले आहेत.
अमेरिका-ब्रिटनने येमेनवर तिसऱ्यांदा केला हल्ला
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्याने मिळून येमेनवर हल्ला केला. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, हुथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागावर सैनिकांनी हल्ला केला. अमेरिकेच्या हवाई दलाचा हवाला देत 36 लक्ष्यांवर हल्ले करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये शस्त्रास्त्रांचा साठा, क्षेपणास्त्रे, हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडारशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे.
वास्तविक, हुथी बंडखोर लाल समुद्रातील जहाजांना सतत लक्ष्य करत आहेत. अमेरिका आणि ब्रिटन याविरोधात कारवाई करत आहेत. दोन्ही देशांमधील ही तिसरी संयुक्त कारवाई आहे. याआधी 28 जानेवारी आणि 11 जानेवारीला अमेरिका आणि ब्रिटनने येमेनवर हल्ला केला होता. त्याच वेळी, 11 जानेवारीपासून अमेरिकेने येमेनमधील हुथी बंडखोरांच्या स्थानांवर नऊ वेळा लक्ष्य केले आहे.
अमेरिकन सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी आखाती देशावर हल्ला केला आहे. 3 जानेवारीला अमेरिकेने इराक-सीरियातील 85 इराणचे तळ नष्ट केले. या हल्ल्यांमध्ये इराकमधील 16 आणि सीरियात 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नागरिकांचाही समावेश असल्याचा दावा इराकने केला आहे. त्याच वेळी, सीरियन मीडियानुसार, अमेरिकेच्या हल्ल्यात नागरिक आणि सैनिकांचा मृत्यू झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App