पाकचे माजी पीएम इम्रान खान आणि पत्नीला 14 वर्षांची शिक्षा; 10 वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या 8 दिवस आधी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दुसऱ्यांदा शिक्षा सुनावण्यात आली आहे. खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तोशाखाना प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.Ex-Pak PM Imran Khan and wife sentenced to 14 years; Banned from contesting elections for 10 years

यानंतर खान 10 वर्षे कोणतेही सरकारी पद भूषवू शकत नाहीत. या निर्णयानुसार दोघांना सुमारे 23.37 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याआधी काल म्हणजेच मंगळवारी रावळपिंडीच्या विशेष न्यायालयाने गुप्त पत्र चोरीच्या प्रकरणात खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती.



त्यांच्यासोबत पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. खान यांना 2 दिवसांत 24 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गेल्या महिन्यातच पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) खान आणि बुशरा बीबी यांच्या विरोधात तोशाखान्याशी संबंधित गुन्हा दाखल केला होता. यामध्ये या दोघांवर सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून भेट म्हणून मिळालेला हार विकल्याचा आरोप आहे. त्यावर सुनावणी करत अकाउंटेबिलिटी कोर्टाने बुधवारी ही शिक्षा सुनावली.

पाकिस्तानी पत्रकार आलिया शाह यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा पाकिस्तानातील इतर पदांवर असलेल्या व्यक्तींना मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती राष्ट्रीय अभिलेखागाराला द्यावी लागते. ते तोशाखान्यात जमा करावे लागतात. जर भेटवस्तू 10 हजार पाकिस्तानी रुपयांची असेल, तर संबंधित व्यक्ती कोणतेही पैसे न देता ती ठेवू शकते.

पंतप्रधान असताना खान यांना सौदीच्या राजपुत्राकडून हिऱ्याचा हार भेट म्हणून मिळाला होता. त्याची किंमत 18 कोटी पाकिस्तानी रुपये होती, तो लाहोरच्या एका प्रसिद्ध ज्वेलरला विकला गेला होता. इम्रान यांची पत्नी बुशरा बीबी यांनी मंत्री झुल्फी बुखारी यांच्यामार्फत हा हार विकला होता.

तोशाखाना (कोषागार) नियमानुसार इम्रान यांनी हा हार जमा करायला हवा होता. मात्र बुशरा यांनी तसे करण्यास नकार दिला. या प्रकरणाचा तपास 2022 मध्ये सुरू झाला. यासाठी ज्वेलरी शोरूमचे मालक आणि व्यवस्थापक यांचीही चौकशी करण्यात आली. यावेळी हार विकल्याचे सीसीटीव्ही फुटेजही सापडले. यानंतर हार जप्त करून तोशाखान्यात जमा करण्यात आला.

Ex-Pak PM Imran Khan and wife sentenced to 14 years; Banned from contesting elections for 10 years

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात