विशेष प्रतिनिधी
मुंबई : महात्मा गांधींच्या हत्येचा सगळा राजकीय लाभ नेहरूंना झाला. काँग्रेसमधला सरदार पटेलांचा गट संपुष्टात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राजकीय करिअर संपले. हिंदूमहासभेसारखा देशात 16 % मते मिळवणारा पक्ष नेस्तनाबूत झाला. गांधींवर गोळ्या नथुरामने झाडल्या, पण त्या त्यांना लागल्याच नाहीत. मग गांधींना लागलेल्या गोळ्या कोणाच्या पिस्तुलातल्या होत्या?? त्यांच्यावर दुसऱ्या कोणी गोळ्या झाडल्या होत्या??, याचा तपास झाला पाहिजे, अशा खळबळजनक मागण्या आणि दावे सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी “मेक श्युअर गांधी इज डेड” आपल्याला नव्या पुस्तकातून केला आहे. Political benefit of Gandhi’s assassination to Nehru
नथुराम गोडसेच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीने महात्मा गांधीजींची हत्या झाली नाही, असा दावा रणजित सावरकर यांनी केला. तपास नीट झाला नाही, त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला, असे सावरकर म्हणाले. फॉरेन्सिक तपासाच्या अहवालाच्या आधारे आपण हे वक्तव्य करत आहोत असं त्यांनी म्हटलं. गांधी हत्येनंतर 20 वर्षांनी जसा कपूर कमीशन नेमला तसा दुसरा कमीशन नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रणजित सावरकरांचा दावा काय?
गांधी हत्येचा डाग स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लावला गेला. नथूराम गोडसेने महात्मा गांधीजींची हत्या केल्याचं सांगितले गेले. मी कपूर कमिशनचा अभ्यास सुरू केला. तो अहवाल काँग्रेस सरकारने नाकारला नाही आणि स्वीकारला नाही. नथुराम गोडसेचे क्रॉस व्हेरिफिकेशन झाले नाही. नथुरामने मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यातून महात्मा गांधींची हत्या झाली नाही. नथुरामच्या पिस्तुलातून सुटलेल्या गोळीचा आकार वेगळा होता प्रत्यक्ष गांधींना लागलेल्या गोळ्यांचा आकारही वेगळा होता. मी या सगळ्याचा अभ्यास केला.
2 फुटांवरून अशा गोळ्या मारणे शक्य नाही, मारलेल्या गोळीचा अँगल देखील वेगळा होता. फॉरेन्सिकचा अहवाल ज्या गोळीबार आधारित आहे त्याचा फोटो जोडला आहे. पोलिसांनी पंचनामे खोटे बनवले. हे सगळे मी पुस्तकात लिहिले आहे. पोलिसांनी तपास नीट केला नाही.
नथुराम गोडसे हे गांधी यांना मारायला आले होते, हे 100 % खरे, त्यांनी गोळ्या झाडल्या हेही 100 % खरे, पण नथुरामच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळीतून गांधींची हत्या झाली नाही.
गांधी हत्येचा तपास नीट झाला नाही. गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला.
गांधी हत्येनंतर 20 वर्षांनी जसे कपूर कमिशन नेमला तसे दुसरा कमिशन नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत. मी कुठलाही स्पेक्यूलेशन करत नाही, मी हे फॉरेन्सिक तपासातून मांडत आहे.
मी केंद्राकडे तपासाची मागणी करणार नाही, ही मागणी लोकांनी करावी. या संबंधित पुस्तक प्रकाशित होऊ नये यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. पण मी हे पुस्तक स्वतः प्रकाशित केले. त्यावेळी अनेक प्रकाशकांनी शेवटच्या क्षणी प्रकाशनाला नकार दिला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App