वृत्तसंस्था
अबुधाबी : अरब देश संयुक्त अरब अमिरातमध्ये श्रीराम मंदिरासारखे भव्य मंदिर उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आहे. या मंदिरात 14 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराचे उद्घाटन करतील, असे सांगण्यात आले.A Hindu temple is being built in Abu Dhabi at a cost of 700 crores; Inaugurated by Prime Minister Modi on February 14
हे मंदिर धार्मिक सद्भाव, सौहार्द व सहअस्तित्वाच्या दृष्टिकोनातून आदर्श ठरेल. शिल्पकला, स्थापत्याचा हा अजोड नमुना ठरेल. या मंदिराची उभारणी अबुधाबीतील सांस्कृतिक जिल्ह्यात 27 एकर क्षेत्रात करण्यात आली आहे. निम्म्या भागात मंदिर तर उर्वरित भागात वाहन तळाची योजना आहे. हे मंदिर म्हणजे स्वप्नाला सत्यात उतरवण्याची कहाणी आहे. बीएपीएस स्वामीनारायण मंदिराच्या आंतरराष्ट्रीय संबंधाचे प्रमुख साधू ब्रह्मविहारी स्वामी म्हणाले, अरब देशांत पहिल्यांदाच बीएपीएसचे परिसंवाद, चर्चा घडवण्यात आली. 1997 मध्ये गुरू प्रमुख स्वामी महाराजांनी भेट दिली होती.
येथे हिंदू मंदिर स्थापन करावे, असा विचार त्यांनी मांडला होता. आज 27 वर्षांनंतर या मंदिराचे स्वप्न सत्यात उतरले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर वाळूपासून पर्वतासारखी रचना तयार करण्यात आली आहे. त्यात सात अमिरातहून आणलेल्या वाळूचाही समावेश आहे.
पुढे गंगा व सरस्वतीचा संगम आहे. तेथे मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी जिन्यातील दोन्ही बाजूने गंगा-यमुनाचे प्रवाह दिसतात. सरस्वतीची कल्पना एका लाइटद्वारे करण्यात आली आहे. यूएई उष्णकटिबंधीय देश आहे. त्याचा विचार करून मंदिराच्या मार्गावर नॅनो टाइल्स बसवण्यात आले आहेत.
त्यामुळे जास्त उष्णता असली तरीही तेथे थंडावा वाटू लागतो. मंदिराच्या उजव्या बाजूला गंगा घाट तयार करण्यात आला. त्यात गंगाजलाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक गंगा घाटावर बसून अध्यात्म्याचा आनंद घेऊ शकतात. या मंदिराला सात शिखरे आहेत. ते यूएईमधील सात अमिरातचे प्रतिनिधित्व करतात. मंदिरात सात देवतांची स्थापना केली जाईल.
राम-सीता, शिव-पार्वती, पुरुषोत्तम भगवान, कृष्ण, अय्यप्पा, जगन्नाथ बालाजी असतील. मंदिराच्या बांधकामात इटालियन मार्बल व राजस्थानच्या लाइमस्टोनचा वापर केला गेला आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर महाभारत, गीतेमधील प्रसंग साकारलेले आहेत.
शिवाय मंदिराच्या भिंतीत शिळांद्वारे संपूर्ण रामायण, जगन्नाथ यात्रा व शिवपुराणही काेरण्यात आले आहे.मंदिरात पंचतत्त्वांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App