तोंड आवरा! मविआची राजवट नाही आता…’ असंही अतुल भातखळकर खासदार जलील यांना म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी परभणी जिल्ह्यातील पूर्ण येथे संविधान गौरव सोहळ्याला उपस्थिती लावली. मात्र, या सोहळ्यात बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकरांबाबत अपशब्द वापरले आहेत. यावरून आता त्यांच्यावर जोरदार टीका सुरू आहे. भाजपाने खासदार जलील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.BJP MLA Atul Bhatkhalkar criticized MP Imtiaz Jalil
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी खासदार जलील यांच्यावर जोरादर टीका केली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना पळपुटे म्हणण्या अगोदर इम्तियाज जलील यांनी आपल्या पक्षाचे मूळ असलेल्या रझाकारांची, सरदार वल्लभभाई पटेलांनी घेतलेल्या हैदराबाद पोलीस ॲक्शनमध्ये झालेली पळापळ अभ्यासावी. पूर्वजांचा इतिहास वाचा आणि नंतर थोबाड उचकटा. आणि हो, तोंड आवरा! मविआची राजवट नाही आता…’ असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.
इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?
परभणी येथील संविधान गौरव सोहळ्यामध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेतील एक उदाहरण दिले. आमचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष खासदार असुद्दिन ओवैसी यांनी लोकसभेत पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि भाजपचे 360 खासदार यांच्यासमोर सांगितले की देशामध्ये केवळ एकच महापुरुष झाले आणि ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते असे सांगितले. पण भाजपच्या नेत्यांनी ते मान्य केले नाही. कारण, त्यांच्या मते देशात एकच महापुरुष आहेत ते म्हणजे सावरकर. पण, ‘ऐसे भगोडे को ना हमने कभी माने है न कभी मानेगे.’ असे म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकर यांच्याविरुद्ध गरळ ओकली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App