शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी कोणते योगदान दिले?, नारायण राणे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यास नकार देणाऱ्या शंकराचार्यांवरच थेट टीका केली आहे. शंकराचार्य पंतप्रधान मोदी यांच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत. त्यांनी आपल्या जीवनात हिंदू धर्मासाठी कोणते योगदान दिले हे सांगावे, असे ते म्हणालेत. राणे यांच्या या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. What contribution did Shankaracharya make to Hinduism?, Narayan Rane asked

राम मंदिर एवढ्या वर्षांनंतर होत आहे, त्याचे कौतूक नाही. हा विषय आतापर्यंत कोणी घेतला नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भाजपनी हा विषय हाती घेतला. शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी? शंकराचार्य हे आमच्या भाजपला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.


सोलापुरात संजय राऊतांच्या कारवर चप्पलफेक; अज्ञातांकडून ‘नारायण राणे जिंदाबाद’च्या घोषणा


केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, राम मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नसून धार्मिक दृष्टिकोनातून होत आहे. राम आमचा दैवत आहे. त्यासाठी मंदिर उभारले जात आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातले हिंदू धर्मासाठी दिलेले योगदान सांगावे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. 19 व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन आज येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चार शंकराचार्यांनी नकार दिला आहे. यावर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही

मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. मी स्पर्धेत नाही, असे म्हणत माजी खासदार नीलेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर भाजप म्हणून आम्ही या मतदार संघावर दावा करत आहे , असे त्यांनी म्हटले आहे.

नीलेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून अधिकाधिक मताधिक्य आपण देऊ असे त्यांनी म्हटले आहे.

घटनेच्या चौकटीत निकाल

नीलेश राणे म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे त्यांनी विशेष कौतुक केले. प्रत्येक मुद्द्याचा विचार करुन कायद्याच्या, घटनेच्या चौकटीत राहून अध्यक्षांनी निकाल दिला आहे. त्यामुळे त्याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला तरी काही उपयोग होणार नाही, असे ते म्हणाले.

What contribution did Shankaracharya make to Hinduism?, Narayan Rane asked

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात