हकालपट्टीच्या निर्णयावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लाच घेतल्याप्रकरणी आणि संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांना सध्या तरी दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. महुआची संसदेतून हकालपट्टी कायम राहील, असे न्यायालयाने म्हटले आहे.Mahua Moitra has no relief from the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सध्या त्यांना अंतरिम दिलासा देता येणार नाही. हे प्रकरण इतके सोपे नाही. यासोबतच महुआचा संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याच्या परवानगीचा अर्जही न्यायालयाने फेटाळला. मात्र, सर्वोच्च न्यायालय मोईत्रा यांच्या हकालपट्टीविरोधातील याचिकेची तपासणी करणार आहे.
न्यायालयाने लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस बजावून या प्रकरणी उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 मार्च रोजी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App