श्रीराम लल्लांच्या आगमनापूर्वीच पीएम मोदींची अयोध्येला 15000 कोटींच्या विकासाची सौगात; विरोधकांचा जळफळाट!!

विशेष प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होत असताना त्यापूर्वीच आज 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या धामाला तब्बल 15000 कोटींच्या विकासाची सौगात दिली आहे. PM Modi’s development gift of 15000 crores to Ayodhya

अयोध्या धाम रेल्वे स्थानक आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन तर त्यांनी केलेच पण त्याचबरोबर अयोध्येतील 15000 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ देखील त्यांनी आज करून दिला. राम लल्लांच्या आगमनापूर्वीच पंतप्रधान मोदींनी आयोध्येला ही विकासाची सौगात दिली पण त्याच वेळी विरोधकांचा त्यामुळे जळफळाट झाला.

पंतप्रधान मोदींनी आज अयोध्येत तब्बल 16 किलोमीटरचा रोड शो केला. यावेळी अयोध्यावासी यांनी दुतर्फा रस्त्यांवर उभे राहून पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अयोध्येत श्रीराम लल्लांच्या आगमनाची तर जोरदार तयारी सुरू आहेच, पण 22 जानेवारी पूर्वीच आज 30 डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी स्वतः येऊन अयोध्यावासियांना एक सुखद धक्का दिला.

महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटना बरोबरच विविध विमान कंपन्यांनी देशातल्या विविध शहरांमधून थेट आयोध्येला जाणाऱ्या विमानांचे वेळापत्रकही जाहीर केले एअर इंडिया एक्सप्रेसने 17 जानेवारी पासून बंगलोर कलकत्ता आणि त्यानंतर दिल्ली या शहरांमधून थेट अयोध्येला विमानसेवांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याचबरोबर अन्य खासगी विमान कंपन्यांनी देखील अशाच स्वरूपांची अयोध्येसाठी थेट विमान सेवांची वेळापत्रके जाहीर केली आहेत.

अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन झाल्याबरोबर अयोध्या ते दरभंगा व्हाव्यासितामढी वंदे भारत रेल्वेचे उद्घाटन हे पंतप्रधानांनी केले त्याचबरोबर अन्य सहा वंदे भारत रेल्वेंना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. देशातली विविध शहरे या वंदे भारत रेल्वेने थेट अयोध्या धामाला जोडली जाणार आहेत. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी कडे जाणाऱ्या तीन महामार्गांचे काम पूर्णत्वाला आले असून श्री राम मार्ग, भक्ती मार्ग, लता मंगेशकर चौक यांचे विशेषत्वाने सुशोभीकरण करण्यात आले आहे पुढच्या वर्षभरात अन्य तीन मार्गांची कामेही पूर्ण होणार आहेत.

– विरोधकांचा कलगीतुरा

एकीकडे अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या सौगात मधून विकास कामांचा असा जोरदार धडाका लागला असताना दुसरीकडे अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाला जायचे की नाही, यावरून विरोधकांमध्ये जोरदार भांडण जुंपले आहे. त्यांचा एकमेकांवरच जळफळाट सुरू आहे. डाव्या पक्षांचा आणि मुस्लिम लीगचा कार्यक्रमाला विरोध आहे, तर काँग्रेसचे नेते प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छित आहेत. या मुद्द्यावरूनच विरोधकांच्या “इंडिया” आघाडीत कलगी तुरा रंगला आहे.

PM Modi’s development gift of 15000 crores to Ayodhya

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात