पवारांनी 38 व्या वर्षी जे करून दाखवलं, ते तुम्ही आता करून दाखवा; 54 वर्षांच्या सुप्रिया सुळेंचे 64 वर्षांच्या अजितदादांना आव्हान!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : शरद पवार 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्यावर घराणेशाहीचे लेबल नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यावेळी जे करून दाखवले ते तुम्ही आत्ता करून दाखवा, असे आव्हान 54 वर्षांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 64 वर्षांच्या अजित पवारांना दिले आहे.Supriya sule challenges ajit pawar to become chief minister now @ age of 64!!

वरिष्ठांनी 38 व्या वर्षीच वसंतदादा पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारण्याची भूमिका घेतली होती आपण तर साठ वर्षे उलटल्यानंतर वेगळी भूमिका घेतली त्यामुळे तुम्ही मला समजून घेतले पाहिजे, असे अजित पवार बारामतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हणाले होते.



शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा हा संदर्भ आल्याने शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे कान टवकारले गेले. त्यामुळे स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही अजित पवारांना भीमथडी जत्रेतून प्रत्युत्तर दिले.

शरद पवार जेव्हा 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले त्यावेळी भारतीय जनता पार्टी त्यांच्या सरकारमध्ये नव्हती. त्यावेळी मी लहान होते. त्यामुळे जे काही तेव्हा घडले ते शालिनीताई पाटील जास्त सांगू शकतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आमच्या काळात बंड नव्हते. आम्ही सगळ्यांनी बसून निर्णय घेतला होता. त्यामुळे कोणाविषयी तक्रार नव्हती, असा दावा शरद पवारांनी केला. आजही कोणी काही केलं असेल, तर त्याविषयी तक्रार करण्याचे कारण नाही. पण पक्ष महत्त्वाचा आहे पक्षाचा संस्थापक कोण आणि कोणी पक्ष वाढवला हे लोकांना माहिती आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली.

शरद पवार 38 व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यानंतर ते महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री झाले अजित पवार 4 वेळा उपमुख्यमंत्री झाले. सुप्रिया सुळे बारामतीतून 4 वेळा खासदार झाल्या. पण 54 वर्षांच्या सुप्रिया सुळे यांनी 64 वर्षांच्या अजित पवारांना 38 व्या वर्षी जे शरद पवारांनी केले ते आता करून दाखविण्याचे आव्हान दिले.

Supriya sule challenges ajit pawar to become chief minister now @ age of 64!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात