विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजप आणि पंतप्रधान मोदी सरकारविरोधात निर्माण झालेल्या इंडिया आघाडीत फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. ताजे उदाहरण बिहारमधील राजकारणाचे आहे. जिथे काँग्रेस नेत्यांच्या काही वक्तव्यांमळे जेडीयूने थेट खर्गे कोण आहेत? असा सवाल केला आहे. यावर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आणि जेडीयूला प्रत्युत्तर दिले गेलं.Split in I.N.D.I.A. front JDU leader said Congress is not reliable who knows Kharge
खरे तर दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधानांचा चेहरा म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षा खर्गे यांच्या नावाचा उल्लेख ममता बॅनर्जी यांनी केला होता. ज्याला अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला होता. यावर JD(U) गोपालपूरचे आमदार गोपाल मंडल यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
गोपाल मंडल म्हणाले, ‘नितीश कुमार यांनी ‘इंडिया’ आघाडी करण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र केले. त्यांनीच सातत्याने बैठका आयोजित केल्या. पण आता पंतप्रधानांबाबत जो मुद्दा उपस्थित केला जात आहे तो मांडायला नको होता. काँग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले की, काँग्रेसने निर्माण केलेली महागाई पाहून लोकांनी काँग्रेसला दूर करून भाजपला सत्तेत आणले. मात्र आता पुन्हा काँग्रेसला आणण्याचा प्रश्नच येत नाही. लोकांचा काँग्रेसवर विश्वास नाही. नितीशकुमार यांना बिहारमध्येच नाही तर देशभरात लोक ओळखतात. तसेच ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना कोण ओळखते? काँग्रेस विश्वासार्ह नाही आणि जनताही काँग्रेसवर विश्वास ठेवणार नाही.
अशा स्थितीत आता प्रश्न उपस्थित होत आहे की, पंजाबप्रमाणेच बिहारमध्येही इंडिया आघाडीत फूट पडणार आहे का? कारण तिथे काँग्रेससोबत जागावाटपासाठी आम आदमी पक्ष तयार नाही. अशा स्थितीत जेडीयूचे आमदार आणि मंत्री आपापले सूर आळवत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App