
वृत्तसंस्था
हैदराबाद : तेलंगणातील हैदराबादमधील राजेंद्र नगर येथील कराची बेकरीमध्ये गुरुवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे बेकरीमध्ये उपस्थित 15 कामगार भाजले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. Gas cylinder blast in Hyderabad’s Karachi Bakerit: 15 injured, 6 critical
गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींपैकी बहुतांश कामगार हे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. दुर्घटनेनंतर बेकरी व्यवस्थापनाने सर्वांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल केला.
दरम्यान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कराची बेकरीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सीएम रेड्डी यांनी अपघातात जखमी झालेल्या कामगारांना चांगले उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.
Gas cylinder blast in Hyderabad’s Karachi Bakerit: 15 injured, 6 critical
महत्वाच्या बातम्या
- संसदेतले घुसखोर दाखवायला गेले बेरोजगारी; प्रत्यक्षात निघाले काँग्रेसी – डावे आंदोलनजीवी!!
- मध्य प्रदेशात “मोहन यादवी” कायदेशीर दंडा सुरू; मशिदींवरच्या लाऊड स्पीकरला चाप; खुल्यावर मांस विक्रीलाही बंदी!!
- धीरज साहू यांच्या घरात सापडलेल्या रोख रकमेनंतर आता घरातील सोन्याचा शोध घेण सुरू
- संसद घुसखोरीत अटक झालेली नीलम सामील होती फुटीरतावाद्यांच्या शेतकरी आंदोलनात; चौघांच्या कारस्थानाचा उलगडा!!