छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णू देव साय मोदींच्या उपस्थितीत उद्या घेणार शपथ

गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आदींची उपस्थिती राहणार.

विशेष प्रतिनिधी

रायपूर : छत्तीसगड भाजपाचे आदिवासी नेते विष्णू देव साय उद्या (१३ डिसेंबर) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. रायपूरमध्ये बुधवारी दुपारी २ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. भाजपने सोमवारी ही घोषणा केली. Vishnu Dev Sai will take oath tomorrow as Chief Minister of Chhattisgarh in the presence of Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासोबतच गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


‘काँग्रेसला गरीबांना गरिबीत ठेवण्यातच रस आहे’, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा हल्लाबोल!


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आवडत्या व्यक्तींच्या यादीत विष्णू देव साय यांचा समावेश आहे. शिवाय ते छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांचे निकटवर्तीय सुद्धा आहेत.

विष्णू देव साय हे चार वेळा खासदार राहिले आहेत. २०२० ते २०२२ पर्यंत ते भाजपच्या छत्तीसगड युनिटचे अध्यक्ष होते. त्यांच्या संघटनात्मक क्षमतेसाठी ओळखली जातात. वादग्रस्त नसलेल्या प्रतिमेमुळे ते राज्यातील भाजपचे लोकप्रिय नेते आहेत.

Vishnu Dev Sai will take oath tomorrow as Chief Minister of Chhattisgarh in the presence of Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात