प्रतिनिधी
बेळगाव : कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले आहेत. पोलिसांचा धाकच उरलेला नाही. बेळगाव जिल्ह्यात मुलाने मुलीला पळवले म्हणून मुलाच्या आईला विवस्त्र करून खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. women stripped paraded naked and beaten up after son elopes with girl in karnataka
बेळगावी शहराजवळील वंटामुरी गावात एका एक मुलगा एका स्थानिक मुलीसोबत पळून गेल्यानंतर हे घृणास्पद कृत्य करण्यात आले. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या बेळगाव येथील सुवर्ण विधानसौदाजवळच ही घटना घडल्याने राज्यातली कायदा सुव्यवस्था किती कुचकामी बनली आहे. पोलिसांचा धाक उठलेला नाही, ही बाब उघड्यावर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुंडप्पा नायक आणि प्रियांका यांचे प्रेमसंबंध होते आणि पण त्या संबंधांना मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या पुरुषाशी लावून द्यायचे ठरवले होते म्हणून ती रविवारी रात्री दुंडाप्पा नायकसोबत पळून गेली.
त्यामुळे प्रियांकाच्या कुटुंबीयांनी संतापून दुंडप्पा नायक यांच्या घरात घुसून तोडफोड केली. त्यांनी दगडफेक करून घराच्या छताच्या फरशा फोडल्या. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी मुलाच्या आईला घराबाहेर ओढले. तिला विवस्त्र करून गावात नेऊन विजेच्या खांबाला बांधून मारहाण केली. या घटनेला भयंकर वळण मिळाले. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांनी बेळगावी जिल्हा रुग्णालयात पीडितेची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी तिच्याकडून घटनेची माहिती घेतली आणि वंटामुरी गावातील तिच्या घरीही भेट दिली. परमेश्वरन तरुणाच्या आजीशीही बोलले, ज्या मुलीसह पळून गेल्या आणि शेजाऱ्यांशी या घटनेबद्दल बोलले.
या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. पण काँग्रेसच्या राजवटीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्या बद्दल त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App