बिहारच्या शिक्षण विभागाने शाळांसाठी एकूण 60 सुट्ट्या निश्चित केल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये शाळांच्या सुट्ट्यांबाबत पुन्हा गोंधळ उडाला आहे. बिहारच्या शिक्षण विभागाने 2024 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यावरून भाजपने नितीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. या यादीबाबत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये आरोप केला आहे की, नितीश सरकारने शाळांमधील हिंदू सणांच्या सुट्या संपवून इतर धर्मांच्या सणांच्या सुट्ट्या वाढवल्या आहेत.Giriraj Singh said Islamic Republic of Bihar
जाहीर केलेल्या यादीबद्दल बोलायचे झाले तर, प्राथमिक शाळांमध्ये किमान 220 दिवस अध्यापन असावे, असे म्हटले आहे. जारी केलेल्या यादीनुसार राज्यातील सर्व सरकारी/राष्ट्रीयकृत आणि अल्पसंख्याक अनुदानित उर्दू (प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) शाळा/मक्तब बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या यादीत बिहारच्या शिक्षण विभागाने शाळांसाठी एकूण 60 सुट्ट्या निश्चित केल्या आहेत. यामध्ये रक्षाबंधनाच्या सुट्टीचा समावेश नाही. तर ३० दिवसांची उन्हाळी सुट्टी देण्यात आली आहे. जे फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे. या दिवसांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App