विशेष प्रतिनिधि
पुणे : अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिने तानिया ही भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. त्यामुळे सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुक केलं जात आहेस. अशातच रिंकूच्या आई-बाबांनी तिला खास सरप्राइज दिलं आहे. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. Rinku Rajguru got surprise gift from her parents!
अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या आगामी कामाबद्दल आणि दैनंदिन जीवनातील गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सध्या तिचे लाल रंगातल्या साडीतले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. केसात गजरा, हातात हिरवा चुडा, नाकात नथ असा अस्सल मराठमोळा अंदाज तिच्या या नव्या फोटोशूटमध्ये पाहायला मिळत आहे. दुसऱ्याबाजूला रिंकूच्या आई-बाबांनी तिला खास सरप्राइज दिलं आहे.
View this post on Instagram A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)
A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)
रिंकूने आई-बाबांनी दिलेल्या खास सरप्राइजचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. रिंकूच्या आई-बाबांनी तिला आयफोन १५ प्रो मॅक्स (iphone 15 pro max) दिला आहे. याचा फोटो शेअर करत रिंकूने लिहीलं आहे, “या सरप्राइजसाठी आय लव्ह यू आई-बाबा.” याचं स्टोरीच्या पुढे रिंकूने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये आई-बाबा मुलीची काळजी घेताना दिसत आहेत आणि त्यावर लिहीलं आहे की, या पृथ्वीतलावर तुमच्या आई-बाबांपेक्षा अधिक प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App