नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस विमानातून उड्डाण केल्याच्या बातम्या सगळीकडे आल्या. त्या बातम्या व्हायरल झाल्या. स्वतः मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर वेगवेगळे फोटो शेअर करून आपल्याला तेजस उड्डाणाचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले. Modi’s make in india marketing strategy behind flying on Tejas
पण मूळात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल, सुखोई MKI ही अत्याधुनिक विमाने असताना आणि राष्ट्रपती, संरक्षण मंत्री यांनी हीच विमाने उडवली असताना पंतप्रधान मोदींनी आपल्या विमान उड्डाणासाठी “तेजस” हे भारतीय बनावटीचेच विमान का निवडले??, त्याचे नेमके रहस्य काय?? असे सवाल तयार झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलीही गोष्ट सहज करत नाहीत. त्यामागे काहीतरी युनिकनेस असतोच, मग त्यांचे अनुयायी आणि भक्त मोदींची ती गोष्ट व्हायरल करतात आणि मोदींचे विरोधक त्यांना ट्रोल करतात. पण मोदींना स्तुती किंवा निंदेतून फरक पडत नाही. कारण मोदींना त्यातून त्या पलीकडचे काहीतरी साध्य करायचे असते आणि तेजस उड्डाणात देखील मोदींना नेमके एक वेगळेच टार्गेट सिद्ध करायचे दिसत आहे.
सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशीचा प्रचार प्रसार आपल्या पद्धतीने आधुनिक भाषेत करतात. त्यासाठी त्यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना रुजवून त्यात “मेक इन इंडिया” ही उपसंकल्पना तयार करून तिचा जागतिक पातळीवर प्रचार प्रसार केला आहे. जागतिक पातळीवरचा सर्व प्रकारचा ग्राहक भारतीय उत्पादनांकडे आकर्षित करण्याचा हा मोदींचा मार्केटिंग फंडा आहे आणि भारतीय उत्पादने त्यातही संरक्षण क्षेत्रातील भारतीय उत्पादनांची आता “मेक इन इंडिया” या धोरणाअंतर्गत निर्यात वाढत असताना मोदींनी अचूक टायमिंग साधत तेजस मधून उड्डाण केले आहे.
भारत आणि गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्रातील आयात टप्प्याटप्प्याने कमी करत आणून निर्यात देखील टप्प्याटप्प्याने वाढविली आहे. यात प्रामुख्याने संरक्षण क्षेत्रातील लॉजिस्टिक सामग्रीचा सध्या समावेश आहे. पण त्या पलीकडे जाऊन लढवय्या या सामग्रीची निर्यात करणे हे भारताचे ध्येय आहे आणि तेजस हे फायटर जेट आहे. मोदींनी उड्डाण केलेले तेजस हे विमान चौथ्या जनरेशनचे फायटर जेट विमान आहे. ते मोदींसारख्या सर्वात व्हीव्हीआयपी व्यक्तीला उड्डाणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड आहे हेच मोदींनी तेजस मधून उड्डाण करून विश्वासाने जगाला दाखवून दिले आहे.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि नंतरच्या विद्यमान महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल विमान उड्डाणाचा अनुभव घेतला आहे. पण मोदींनी आपल्या विमान उड्डाणासाठी तेजसची निवड करून मेक इन इंडियाच्या गुणवत्तेवर 100% शिक्कामोर्तब केले आहे.
भारतीय बनावटीचे तेजस
तेजस हे DRDO आणि HAL हिंदुस्थान एरॉनॉटिक्सने मिळून विकसित केलेले फायटर विमान आहे. आज भारताचाही फायटर विमान बनवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये समावेश होतो. पण एखाद फायटर जेट बनवण सोप नाही. कारण बरीच नवीन टेक्नोलॉजी, वायरिंग त्यामध्ये असते. भारतीय वैज्ञानिकांनी आपल्या मेहनतीने हे सिद्ध करून दाखविले आहे.
तेजसवर अनेक देश प्रभावित
HAL आता तेजस मार्क 1 ची निर्मिती करत आहे. हे तेजस पुढच व्हर्जन आहे. त्यामध्ये अधिक अत्याधुनिक शस्त्रास्र आहेत. तेजस फायटर जेटही जगातल्या काही देशांना प्रभावित केले आहे. यात मलेशिया, अर्जेंटिनासारखे देश आहेत. भविष्यातील ते तेजस विमानाचे संभाव्य खरेदीदार असू शकतात. तेजसमध्ये आपण जितक्या सुधारणा करू तितकी त्याची एक्सपोर्ट व्हॅल्यू वाढणार आहे. परिणामी परकीय चलन आपल्याकडे येईल. तेजस हे एक हलक आणि अन्य फायटर जेटच्या तुलनेत स्वस्तात बसणार विमान आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तेजसमधून जे उड्डाण केले, त्याचे फायदे भविष्यात भारताला मिळणे अपेक्षित आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App