मराठा समाजाला क्रिमीलेयरच्या अटीसह 16 % आरक्षण दिले, पण त्याचवेळी माझे सरकार पाडले; पृथ्वीराज चव्हाणांचा पवारांवर निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने वेगाने प्रक्रिया सुरू केली असताना आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी जुलै 2014 मध्ये मराठा समाजाला 16 % आरक्षण दिले होते. पण नंतर लगेच माझे सरकार मुदतीपूर्वीच पाडण्यात आले, अशा स्पष्ट शब्दांमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांवर निशाणा साधला, पण मराठी माध्यमांमध्ये मात्र बातम्या चव्हाण यांनी फडणवीसांवर निशाणा साधल्याच्या आल्या. Overthrew my government; Prithviraj Chavan targets Pawar

माझ्या सरकारच्या काळात दिलेल्या आरक्षण त्यानंतर आलेल्या नव्या सरकारला म्हणजे फडणवीस सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. मी ज्या फॉर्मुल्याने मराठा आरक्षण दिलं त्याच फॉर्मुल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतर या आरक्षणाविषयी पहिल्यांदा मी हा प्रश्न हाताळला होता. आम्ही कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षणाचा प्रश्न हाताळला होता. त्यावेळी आम्ही न्यायालयाची सब कमिटी नेमली होती. यामध्ये मराठा समाजाला क्रिमीलेयरची अट घालून 2014 मध्ये 16 % टक्के आरक्षण दिले आणि मुस्लिमांच्या मागासलेल्या लोकांना अशा 50 जाती शोधून 5 % आरक्षण त्याकाळी दिले होते. पण मुदतीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेऊन माझे सरकार पाडले त्यामुळे हे आरक्षण टिकू शकल नाही, असा निशाणा पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला.

फडणवीसांकडून फसवणूक

देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत 16 % ऐवजी 12 % आरक्षण द्यायचा प्रयत्न केला होता. मात्र ती निव्वळ फसवणूक होती, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची गरज आहे, असं ते म्हणाले.

त्यांच्यात हिंमत नाही

सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येत नाही. त्यांच्यात तेवढं धाडस उरलेलं नाही. निवडणुका घेतल्या नाहीत, तर आरक्षणाला अर्थ नाही, असं ते म्हणाले. धनगर समाजाला 15 दिवसात आरक्षण देतो असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता तेच बोलतील, असा चिमटाही त्यांनी काढला.

मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जी वस्तुस्थिती मांडली त्यावरून पवारांनीच मराठा आरक्षणात अडथळा आणल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र 2014 पर्यंत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले, पण शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण सरकारला दिलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मागे घेऊन मदतीपूर्वीच सरकार पाडले ही वस्तुस्थिती पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखित केली.

Overthrew my government; Prithviraj Chavan targets Pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात