विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुराव्यांवर आधारित कुणबी दाखले देण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी अमान्य केला आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आंदोलनावर जरांगे पाटील ठाम आहेत. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांच्या आग्रहाखात जरांगे पाटलांनी चार घोट पाणी घेतले. दरम्यानच्या काळात त्यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोन आला, त्यावेळी जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली.Kunbi evidence; But Jarange’s political commentary against the Ajitdada group; Warning that Prakash Solanke will not be elected in the society too!!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मराठा आंदोलनातील हिंसक पडसादावर भाष्य करताना आंदोलन भरकटत चालण्याचा इशारा जरांगे पाटलांना दिला. त्यावर आंदोलन भरकटलेले नाही, असे उत्तर जरांगे पाटलांनी दिले, पण अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिप करून मराठा आंदोलकांनी त्यांचे त्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यांच्या गाड्या जाळल्या. या मुद्द्यावर मात्र जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांचा त्याच्याशी संबंध नसल्याचा दावा केला. त्याचवेळी मोठे राजकीय भाष्य करत प्रकाश सोळंके आता इथून पुढे सोसायटी सोसायटीच्या निवडणुकीतही निवडून येणार नाहीत, असा इशारा दिला. मराठा आंदोलनात राजकारण शिरल्याचे अधिक स्पष्ट झाले होते ते जरांगे पाटलांच्या वक्तव्या नंतरचा अधिक ठळक झाले आहे.
मराठा आंदोलकांचा जास्तीत जास्त रोष सत्ताधारी पक्ष भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर दिसत आहे. मराठा आरक्षणाचा विषय आल्यावर अजित दादांना डेंग्यू झाला, अशी टीका मनोज जरांगे पाटलांच्या मुलीने केली. मराठा आंदोलकांनी यवतमाळ मध्ये सरकार आपल्या दाराशी या कार्यक्रमाच्या पोस्टरला काळे फासले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App