आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात, मृतांची संख्या ९ वर पोहचली, ४० पेक्षा अधिकजण जखमी

मानवी चुकीमुळे दोन रेल्वे एकमेकांवर धडकल्या

विशेष प्रतिनिधी

आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी (२९ ऑक्टोबर) दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर झाली. या रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मृतांना भरपाई जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. Fatal train accident in Andhra Pradesh death toll rises to 9 more than 40 injured

०८५३२ विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि ०८५०४ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल अशी  अपघातग्रस्त  रेल्वेंची नावे असल्याचे रेल्वे विभगाकडून सांगितले गेले आहे. या धडकेमुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. ज्या मार्गावर हा रेल्वे अपघात झाला तो हावडा-चेन्नई मार्ग म्हणून ओळखला जातो. सध्या रेल्वे ट्रॅक स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.

विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विजयानगरम जिल्ह्यातील कंटकपल्ले येथे संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास  विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनला मागून धडक दिल्याचे रेल्वेने म्हटले आहे. त्यामुळे चार डबे रुळावरून घसरले. अपघातामागील मानवी चूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Fatal train accident in Andhra Pradesh death toll rises to 9 more than 40 injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात