”तर आम्हाला आमची दुसरी कोणती भूमिका घ्यायची नाही.” असंही रोहित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी युवा संघर्ष यात्रा स्थगित केली. याचबरोबर या स्थगितीचा निर्णय का घेतला याचे कारणही त्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले होते. मात्र या दरम्यान त्यांनी ही यात्रा मराठा आंदोलनाला घाबरून बंद केली का, अशी चर्चा सुरू झाल्यावर त्यांनी यावर प्रतिक्रयाा दिली.So yes I am scared was the statement made by Rohit Pawar while suspending the Yuva Sangharsh Yatra
पत्रकारपरिषदेत रोहित पवार म्हणाले, ”महाराष्ट्र आज अस्वस्थ आहे. अनेक विविध ठिकाणी मराठा समजातील तरूण आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही लढतोय तेच तरूण जर आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलत असतील, तर मग अशा परिस्थितीत मी यात्रा पुढे कशी घेऊन जाऊ शकतो. एका गावात आम्हाला आडवलं होतं. आम्ही स्वत: जाऊन तिथे चर्चा केली. चर्चेनंतर ते स्वत: आमच्याबरोबर आले. त्यांचं मत आलं की आरक्षणाला तुम्हाला पाठींबा द्यावा लागेल, जो आम्ही दिलाच आहे.
पण त्याबरोबरच तुम्ही जे घेतलेले मुद्दे आहेत, तेही महत्त्वाचे आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक गावात जाऊन ही भूमिका आम्ही घेऊ शकलो असतो. पण नाही, जर आपला महाराष्ट्र अशांत असेल. तर आम्हाला आमची दुसरी कोणती भूमिका घ्यायची नाही. ही यात्री आपण उद्या कधीतरी काढू. पण आज तरी नाही, आज आम्ही तूर्तास ही यात्रा स्थगित करत आहोत.” असं रोहित पवारां यांनी यावेळी जाहीर केलं.
याचबरोबर ”मी माझी भूमिका इथे सांगितलेली आहे. मी स्वत: मराठा आहे. माझी यात्री मी कशामुळे स्थगित करत आहे, हे मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल मी घाबरलो का? जर या महाराष्ट्रात युवा आत्महत्या करत असेल, तर होय मी घाबरलो. हा जो स्वाभिमानी, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. तो जर अशांत असेल तर होय मी घाबरलो. आज जर युवकांना संधी मिळत नसेल, त्यामुळे जर युवक वेगळा कोणता तरी निर्णय घेत असतील, तर होय मी घाबरलो.” असं रोहित पवारांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App