प्रतिनिधी
नाशिक : सणासुगीच्या दिवसांमध्ये कांद्याचे दर वाढत असताना शेतकऱ्यांना लाभ व्हावा आणि ही दरवाढ आटोक्यात यावी यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कांदा निर्यातीवर लादलेले 40 % निर्यात शुल्क रद्द केले आहे. Abolition of 40% export duty on onion
देशभरात अनेक ठिकाणी 70 ते 80 रुपये किलोने विकला जात आहे. गेल्या आठवड्याभरातच कांद्याची किंमत 15 ते 20 रुपयांनी वाढली आहे. येत्या काळात कांद्याची किंमत 100 रुपयांवर जाणार असल्याची चर्चा आहे. ऐन सणासुदीत कांद्याचे दर वाढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 40 % शुल्काचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होणार आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 40 % शुल्क रद्द केल्याचा जीआर केंद्र सरकारने काढला आहे. डिसेंबर अखेर 800 डॉलर प्रति टन किमान निर्यात शुल्क राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात करायचा आहे, ते करू शकतात. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.
देशातील बाजारांमध्ये कांद्यांची आवक वाढवण्यासाठी आणि कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या होत्या.
प्रचंड विरोध, आंदोलन
केंद्र सरकारने लावलेल्या निर्यात शुल्काला शेतकरी, कांदा उत्पादकांनी प्रचंड विरोध केला होता. महाराष्ट्रात तर सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात बेमूदत आंदोलन पुकारण्यात आले होते. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवून कांदा लिलाव बंद ठेवला होता.
केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याशीही कांदा उत्पादकांनी वारंवार चर्चा झाली होती. पण त्यातून काहीच तोडगा निघाला नव्हता. निर्यात शुल्काविरोधातील आंदोलन सुरूच होतं. त्यामुळे अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून निर्यात शुल्क रद्द केले आहे. त्यामुळे आता बाजारातील कांद्याची आवक वाढणार असून कांद्याच्या किंमती स्वस्त होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App