वृत्तसंस्था
सुरत : गुजरातमधील पालनपूर पाटियाजवळील नूतन रो हाऊससमोर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धेश्वर अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.7 suicides of one family in Surat, father poisoned all and hanged himself; 3 children died
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. वडिलांनी कुटुंबियांना औषध देऊन गळफास घेतला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील सात सदस्यांमध्ये पती-पत्नी, आई-वडील, दोन मुले आणि एक मुलगी यांचा समावेश आहे. या घटनेचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांनी प्रथम मृतदेह रुग्णालयात हलवण्याची कारवाई केली आहे. यासोबतच आजूबाजूचे लोक आणि कुटुंबीयांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज आता वर्तवला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App