विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने तीन तलाक विरोधी कायदा केल्यानंतर आता पुढचे पाऊल टाकत लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याची तयारी चालवली आहे. लवकरच हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.Preparation of law against love jihad by Modi government
आपली व्यक्तिगत ओळख लपवून एखाद्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करणाऱ्या व्यक्तीस कठोरातील कठोर शिक्षा फर्मावण्याची तरतूद या कायद्यात असणार आहे. आपली ओळख लपवून अनेक मुस्लिम तरुणांनी हिंदू मुलींना फसवल्याची देशभरातून उदाहरणे समोर येत असताना केंद्र सरकार हा लव्ह जिहाद विरोधी कायदा करणार आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, हरियाणा यासारख्या राज्यांनी हा कायदा संमत करून आपापल्या राज्यांमध्ये अंमलबजावणी देखील केली आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रातला कायदा अधिक कठोर करण्याची मोदी सरकारची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. काही पुरुष पत्नीपासून लपवून विवाहबाह्य संबंध ठेवतात. विशेष म्हणजे काही प्रकरणांमध्ये संबंधित पुरुष हे दुसऱ्या महिलेला आपले लग्न झाल्याची माहिती देत नाहीत. ते लग्न झाल्याची माहिती लपवून दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवतात. काही जण तर पहिलं लग्न लपवून दुसरंही लग्न करतात. अशाप्रकारे ते दोन महिलांना फसवतात. पण अशी फसवणूक करणाऱ्यांना आता कायद्याचा चाप बसणार आहे.
विवाहित असताना अविवाहित असल्याचा देखावा करून, आपली खरी ओळख लपवून लग्न करणाऱ्यांना आता यापुढे 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पावसाळी अधिवेशनात भारतीय दंड संहिता (IPC) 1860 मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारतीय न्यायिक संहिता 2023 (BNS) विधेयक IPC लोकसभेत सादर केले होते. या विधेयकात महिलांवरील गुन्ह्यांबाबत कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.
तर नव्या या विधेयकात महिलेची ओळख लपवून तिच्याशी लग्न करणे हा गुन्हा ठरवण्यात आलाय. तसंच या तरतुदींमुळे सरकार लव्ह जिहादवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
…तर तो बलात्कार मानला जाणार नाही, पण…
याप्रकरणी आणखी एक महत्त्वाची माहिती मिळत आहे. एखाद्या व्यक्तीने आपली ओळख लपवून लग्न केलं किंवा महिलेशी संबंध प्रस्थापित केले. तर तो बलात्कार मानला जाणार नाही. पण छळ नक्कीच मानला जाईल आणि त्यातून संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई होईल. त्याच्यावर 10 वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूर असण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App