केजरीवालांनी छत्तीसगडमध्ये काँग्रेसला दिले आव्हान; ‘’I-N-D-I-A मध्ये ‘निकाह’पूर्वीच तीन तलाक’’ भाजपाने लगावला टोला!

UP BJP candidate list: In the first list of BJP, 44 OBCs, 19 SCs, 10 women, cut tickets of more than 20 MLAs, read more

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी विरोधी पक्षांच्या एकतेवर निशाणा साधला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  एकीकडे नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षाने I-N-D-I-A आघाडी स्थापन केली आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे सोडत नाहीत. नुकताच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी छत्तीसगडचा दौरा केला आणि त्यांनी काँग्रेस सरकारला भ्रष्ट म्हटले. यावरून आता भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी विरोधी पक्षांच्या एकतेवर टोला लगावला आहे. Kejriwal challenges Congress in Chhattisgarh In INDIA three talaqs before Nikah BJP attacked

शहजादने ट्विटमध्ये विरोधी आघाडीबद्दल लिहिले की, “मागील काही दिवसांत निकाहपूर्वी तिहेरी तलाकची परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस म्हणते की आम्ही दिल्लीत आपच्या विरोधात सर्व जागा लढवू, तर आप म्हणते की काँग्रेसचे अस्तित्व नाही. काँग्रेस नेते अनिल चौधरी यांनी केजरीवाल यांना भ्रष्ट म्हटले आहे., विरोधी पक्ष एकमेकांवर हल्ले करत आहेत.’’

ते पुढे म्हणाले, “केजरीवाल यांनी छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला आहे. गुंडू राव यांच्यानंतर पवन खेडा यांनी दिल्ली मॉडेलला आव्हान दिले आहे, तर अलका लांबा यांनी केजरीवाल यांना आपचे ठग म्हटले आहे. अमित शाह यांचे म्हणणे योग्य आहे की या लोकांचे काम संपले की, त्यांची मैत्रीही संपते.’’

विशेष म्हणजे 16 ऑगस्ट रोजी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली काँग्रेसची बैठक झाली. यामध्ये राहुल गांधीही सहभागी झाले होते. या बैठकीबाबत काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी सांगितले की, काँग्रेस दिल्लीतील सातही जागा लढवण्याची तयारी करत आहे. मात्र, नंतर अलका लांबा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने लांबा यांना असे वक्तव्य करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. तथापि, I-N-D-I-A मध्ये आप आणि कॉंग्रेसमध्ये सर्व काही ठीक नाही अशी बरीच चर्चा झाली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी 19 ऑगस्ट रोजी छत्तीसगडमध्ये उर्वरीत कसर पूर्ण केली. रायपूरमध्ये काँग्रेस भ्रष्ट असल्याचे सांगून केजरीवाल म्हणाले, “छत्तीसगडला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे. यापूर्वी दिल्ली आणि पंजाबमध्येही खूप भ्रष्टाचार होता, पण आम्ही तो दूर केला.”

Kejriwal challenges Congress in Chhattisgarh In INDIA three talaqs before Nikah BJP attacked

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात