प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि डॉ. भारती पवार यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घातला, त्याचबरोबर पवार काका – पुतण्यांच्या सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या नियोजित कार्यक्रमांवर मराठा क्रांती मोर्चाने बंदी घालण्याचा पुकारा केला आहे. Maratha protestors disrupt Union minister’s programs
राज्यात मराठा आंदोलनाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. मनोज जरांगे हे सध्या अनेक ठिकाणचा दौरा करत असून यानिमित्ताने मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या अमृत कलश यात्रेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला. नाशिकमधील नांदगाव येथे कार्यक्रम सुरु असताना आंदोलकांनी त्यात गोंधळ घातला. यावेळी भारती पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.
भारती पवार भाषण करत असतानाच मराठा आंदोलकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. मराठा आंदोलकांनी आधी आमच्याशी बोला असा आग्रह धरला. यादरम्यान व्यासपीठासमोर “एक मराठा लाख मराठा” अशी घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर भारती पवारांनी व्यासपीठावरूनच आंदोलकांचे कान टोचले. शहिदांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या कार्यक्रमात गोंधळ घालणं चुकीचं असल्याचे त्या म्हणाल्या. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले.
शिंदे – फडणवीस – अजितदादांना टार्गेट करत जरांगे पाटलांचे भुजबळ, सदावर्तेंवर शरसंधान; पण प्रस्थापित मराठा नेतृत्वालाच खरे आव्हान!!
रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमातही गोंधळ
याआधी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमातही मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. बदनापूरमध्ये “मेरी माटी मेरा देश” या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे उपस्थिती होते. मात्र मराठा आंदोलकाने आत्महत्या केली असल्याने हा कार्यक्रम करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन सोडले. पण मराठा आरक्षण मिळेपर्यंत एकही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
पवार काका-पुतण्यांना प्रवेशबंदी
मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगेंच्या आक्रमक भूमिकेची झळ आता पवार काका – पुतण्यांनाही बसते आहे. येत्या 23 ऑक्टोबरला सोलापुरात पिंपळनेर साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी अजित पवार येणार आहेत. मात्र अजित पवारांना पिंपळनेरमध्ये येऊ देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा आंदोलकांनी घेतली आहे, तर त्याचदिवशी माढा तालुक्यातील कापसेवाडीत शरद पवार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत. मात्र शरद पवारच काय, कुणाही नेत्याला सोलापुरात येऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App