गुजरात ‘ATS’ने हेरगिरीच्या आरोपाखाली ५३ वर्षीय व्यक्तीला केली अटक, पाकिस्तानला माहिती पाठवायचा!

लष्करी आणि हवाई दलाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला झाली अटक 

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गुजरात एटीएसने हेरगिरीच्या आरोपाखाली एका ५३ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. लाभशंकर महेशवीर असे आरोपीचे नाव आहे. एटीएसने लष्करी आणि हवाई दलाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. Gujarat ATS arrested a 53 year old man on charges of espionage to send information to Pakistan

या वर्षी जुलैमध्ये एमआयच्या अधिकाऱ्यांना पाकिस्तानी इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) द्वारे चालवले जाणारे नापाक ऑपरेशन आढळून आल्याचे प्राथमिक पोलिस तपासात उघड झाले आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअॅप नंबरद्वारे सुरक्षा दलाच्या जवानांना १५ ऑगस्टपूर्वी त्यांच्या अँड्रॉईड मोबाइल हँडसेटमध्ये ‘हर घर तिरंगा अभियान’ नावाने ‘apk’ अँड्रॉइड अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगण्यात आले होते.

तपासात समोर आले आहे की, आरोपीने शाळेचा अधिकारी असल्याचे दाखवून लोकांना आपल्या मुलासोबत राष्ट्रध्वजाचे छायाचित्र अपलोड करण्यास सांगणारा संदेशही पाठवला होता. असे सैनिक ज्यांची मुले आर्मी स्कूल किंवा डिफेन्स स्कूलमध्ये शिकतात. आरोपी लाभशंकर माहेश्वरीने हा भारतीय क्रमांक पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला पुरवल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपीच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीत हा व्हॉट्सअॅप नंबर पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे लोक वापरत असल्याचे समोर आले आहे. याद्वारे ते सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मोबाईल हॅक करून त्यांच्या मोबाईलवरून गुप्तचर माहिती मिळवत आहेत.

Gujarat ATS arrested a 53 year old man on charges of espionage to send information to Pakistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात