TMC खासदार महुआ मोईत्रा यांना अदानी ग्रुपबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आरोप केलाल आहे. आता या प्रकरणात गुरुवारी (19 ऑक्टोबर) नवीन वळण लागले. पंतप्रधान मोदींची प्रतिमा डागाळण्यासाठी महुआ मोईत्रा यांनी गौतम अदानी यांना लक्ष्य केल्याचा दावा उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे. Hiranandanis Explosive Confession Mahua targets Adani to defame PM Modi
राजकारणात झपाट्याने प्रगती करण्याच्या उद्देशाने महुआ मोईत्रा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करायचे होते आणि त्यामुळेच त्यांनी अदानींना लक्ष्य केले, अशी कबुलीही हिरानंदानी यांनी दिली. हिरानंदानी यांच्या म्हणण्यानुसार, महुआ देखील पंतप्रधान मोदी, अदानी यांना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सतत संपर्कात होती.
रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या हिरानंदानी ग्रुपने TMC खासदार महुआ मोईत्रा यांना अदानी ग्रुपबाबत संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी म्हणाले की, मोईत्रा यांनी हे केले कारण मोदींच्या निर्दोष प्रतिमेमुळे विरोधकांना त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App