…मग रोहित आणि ब्रिगेडला उपांत्य फेरी गाठण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
विशेष प्रतिनिधी
पुणे : यंदाचा एकदिवसीय विश्वचषक २०२३ आता अतिशय रोमांचक होत आहे. कारण श्रीलंका वगळता सर्व 9 संघांनी आपले विजयाचे खाते उघडले आहे. यामध्ये विशेष म्हणजे अफगाणिस्तानने इंग्लंडचा तर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. पण या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणि न्यूझीलंडचा आता पर्यंतचा प्रवास खूपच छान झाला आहे. किवी संघाने पहिले चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारतीय संघाने पहिले तीन सामने जिंकले असून दुसऱ्या स्थानावर आहे. World Cup 2023 Will Indian team directly reach semi-finals if they beat Bangladesh Learn the equation
भारतीय संघ आज बांग्लादेशविरोधात विश्वचषकाताली आपला चौथा सामना पुण्याच्या मैदानावर खेळत आहे. जर भारतीय संघ हा सामना जिंकला तर तो न्यूझीलंडला मागे टाकेल आणि किवी संघासह थेट उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अगदी जवळ येईल.
बांगलादेशला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघाने पुढील 2 सामने जिंकले, तर 6 विजयांसह 12 गुणांसह भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी मजबूत दावा करेल. मात्र उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला पुढील आणखी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. मग रोहित आणि ब्रिगेडला उपांत्य फेरी गाठण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. बांगलादेशचा पराभव करून पुढील 3 सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचे 7 सामन्यात एकूण 14 गुण होतील. सध्या भारतीय संघ 3 सामने जिंकून 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्याला उर्वरित 6 पैकी किमान 3 ते 4 सामने जिंकावे लागतील.
भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर धर्मशाला येथे न्यूझीलंड, लखनऊमध्ये इंग्लंड, मुंबईत श्रीलंका, कोलकाता येथे दक्षिण आफ्रिका आणि बंगळुरूमध्ये नेदरलँड्सविरुद्ध उर्वरित सामने खेळायचे आहेत. यामध्ये भारतीय संघाला न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्याशी स्पर्धा होऊ शकते. बांग्लादेश आणि नेदरलँड हे धक्का देण्यात माहीर आहेत. अशा स्थितीत त्यांच्याबाबतही भारतीय संघाला सावध राहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App