Israel Hamas War : केरळची ‘सुपरवुमन’! हमासच्या दशतवाद्यांच्या तावडीतून केली वृद्ध महिलेची सुटका

इस्रायल सरकारकडून होत आहे कौतुक, जाणून घ्या काय घडला नेमका प्रसंग

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतातील इस्रायल दूतावासाने मंगळवारी सोशल मीडियावर दोन केरळवासीयांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी हमासच्या हल्ल्यादरम्यान दरवाजाचे हँडल धरून आणि दहशतवाद्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखून इस्त्रायली नागरिकांचे प्राण वाचवले, ज्यांची ते देखभाल करत होते. Israel Hamas War Keralas ‘Superwoman An elderly woman was rescued from the clutches of Hamas extremists

TOI नुसार, इस्रायली दूतावासाने ट्वीटरवर  एका पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘भारतीय वीरांगणा! मूळची केरळची रहिवासी असलेल्या सबिता ज्या आता इस्त्रायलमध्ये कार्यरत आहे. सांगत आहेत की,कशाप्रकारे त्यांनी आणि मीरा मोहन यांनी मिळून इस्त्रायली नागरिकांची जीव वाचवला. हमासच्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान या वीरांगणांनी सेफ हाउसचे दरवाजे उघडू दिले नाही, कारण दहशतवादी आतमध्ये घुसून नागरिकांना ठार करू इच्छित होते.

व्हिडीओमध्ये सबिता सांगतात की, त्या तीन वर्षांपासून नीर ओझ नावाच्या सीमावर्ती भागात किबुत्झमध्ये काम करत आहे. येथे मीरा मोहनसह एएलएमएस आजाराने ग्रस्त असणाऱ्या एका वृद्ध महिलेची काळजी घेत आहे. त्यांंनी व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘मी नाईट ड्युटीवर होते आणि ड्युटी संपवून निघणार होते तेव्हा  साडेसहाच्या सुमारास सायरन वाजला. आम्ही सुरक्षा कक्षाकडे धाव घेतली. सायरन थांबले नाहीत आणि लवकरच आम्हाला राहेल यांच्या मुलीचा फोन आला की गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. त्याने आम्हाला दरवाजे बंद करून आत राहण्यास सांगितले. काही मिनिटांतच आम्हाला बंदुकींचा आवाज आणि काचा फुटल्याचा आवाज आला. दहशतवादी आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते.

सबिता यांनी पुढे सांगितले की, त्यांनी राहेल यांच्या मुलीला पुन्हा फोन केला आणि तिला काय करायचे ते विचारले. त्याने आम्हाला दरवाजा धरायला सांगितले. आपले पाय जमिनीवर घट्ट पकडता यावेत यासाठी दोघांनी चप्पल काढल्याचे सबिता यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले, ‘सकाळी साडेसात वाजेपर्यंत दहशतवादी घराबाहेर होते, ते दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही दार दाबून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांनी दरवाजावर हल्ला केला आणि नंतर गोळीबार केला. त्यांनी सर्व काही नष्ट केले.

बाहेर काय चालले आहे याची कल्पना नसल्याचे सबिता यांनी सांगितले. दुपारी एक वाजेच्या सुमारास, त्यांनी पुन्हा गोळीबार ऐकला,  इस्त्रायली सैन्य त्यांना वाचवण्यासाठी आले होते. ते पुढे म्हणाले, ‘आमच्याकडे काहीच उरले नाही. त्यांनी मीराच्या पासपोर्टसह आमची पूर्णपणे लूट केली. आम्ही सीमेवर राहत असल्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत मी माझी कागदपत्रे एका पिशवीत ठेवली होती पण तीही काढून घेण्यात आली.

Israel Hamas War Keralas Superwoman An elderly woman was rescued from the clutches of Hamas extremists

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात