राहुल गांधी हे खरे तर “इलेक्शन गांधी”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या कन्येचे टीकास्त्र!!

वृत्तसंस्था

निजामाबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे तेलंगण दौरे वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर शरसंधान साधले आहे. काँग्रेस आणि भाजपचे सर्व वरिष्ठ नेते हे तेलंगणामध्ये पॉलिटिकल टूरिस्ट आहेत, असे टीकास्त्र सोडून राहुल गांधींना त्यांनी “इलेक्शन गांधी” असे म्हटले आहे. rahul gandhi is election gandhi k kavita statement

भाजपचे वरिष्ठ नेते नुकतेच तेलंगणात येऊन गेले आज राहुल गांधी आणि प्रियांका गांधी येत आहेत. हे सगळे नेते तेलंगणात “पॉलिटिकल टुरिस्ट” म्हणून येतात. भाषणे करतात आणि निघून जातात. तेलंगणाचा हक्क हा विषय समोर आला, की यापैकी कोणीही नेते काहीही करत नाहीत. त्यातही राहुल गांधींना तर, मी राहुल गांधी असे न म्हणता “इलेक्शन गांधी” असेच म्हणेन. कारण प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला ते तेलंगणात येतात. भाषणे करतात. वायदे करतात, पण एकही वायदा ते पुरा करत नाहीत. कारण कुठलाही वायदा पुरा करणे ही काँग्रेसची सवयच नाही, अशा बोचऱ्या शब्दांमध्ये के. कविता यांनी राहुल गांधींवर शरसंधान साधले.

भाजपचे तेलंगणामध्ये अस्तित्वच नाही. काँग्रेस देखील या विधानसभा निवडणुकीत पूर्ण मार्जिनलाइज होईल आणि भारत राष्ट्र समितीची तेलंगणात प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन होईल, याविषयी आमच्या मनात शंका नाही, असा दावाही के. कविता यांनी केला.

लोकसभा निवडणूक आणि वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी वेगवेगळ्या मंदिरांना भेटी दिल्या. पूजाअर्चा केली. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे राहुल गांधींचे “टेम्पल रन” असे मिम्सही अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले. आता त्या “टेम्पल रन” नंतर राहुल गांधींचे के. कविता यांनी थेट “इलेक्शन गांधी” असेच नामकरण केले आहे. आता या नामकरणावर काँग्रेस आणि राहुल गांधी कोणते प्रत्युत्तर देतात??, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

rahul gandhi is election gandhi k kavita statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात