विशेष प्रतिनिधी
भोपाळ : काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यात तब्बल 90 आश्वासने दिली, यामध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर आले, तर आयपीएल गेम मध्ये मध्य प्रदेशची टीम उतरवण्याचे आश्वासन आहे, पण प्रत्यक्षात काँग्रेसमध्ये मात्र कपडे फाडाफाडीचे खेळ सुरू झाले आहेत.Congress manifesto promises IPL team; In fact, the game wears rags!!
मध्य प्रदेशात आज काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात भरपूर आश्वासने दिली त्यातले एक आश्वासन मध्य प्रदेश मध्ये काँग्रेस सत्तेवर आली, तर राज्याची टीम आयपीएल गेम मध्ये उतरविण्याचे आहे, पण प्रत्यक्षात काँग्रेस नेते मात्र एकमेकांचे कपडे फाडण्याची भाषा बोलत आहेत.
शिवपुरी मधून वीरेंद्र रघुवंशी या भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्याचे तिकीट काँग्रेस नेत्यांनी कापले, त्या मुद्द्यावर जाब विचारण्यासाठी रघुवंशींचे समर्थक कमलनाथ यांच्याकडे पोहोचले, त्यावेळी कमलनाथ यांनी जा तिकडे जाऊन दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांचे कपडे फाडा!!, असे सांगून रघुवंशी समर्थकांना हाकलून दिले.
"आप जाकर दिग्विजय सिंह और जयवर्धन के कपड़े फाड़िए…"यह हैं कपटनाथ किसके साथ कपट कर दें कुछ नहीं पताकांग्रेस ऐसे ही कपटी पार्टी नहीं कहलाती#MadhyaPradeshElection2023 pic.twitter.com/oNNsQutqdy — Gaurav Bhatia गौरव भाटिया 🇮🇳 (Modi Ka Parivar) (@gauravbhatiabjp) October 17, 2023
"आप जाकर दिग्विजय सिंह और जयवर्धन के कपड़े फाड़िए…"यह हैं कपटनाथ किसके साथ कपट कर दें कुछ नहीं पताकांग्रेस ऐसे ही कपटी पार्टी नहीं कहलाती#MadhyaPradeshElection2023 pic.twitter.com/oNNsQutqdy
— Gaurav Bhatia गौरव भाटिया 🇮🇳 (Modi Ka Parivar) (@gauravbhatiabjp) October 17, 2023
कमलनाथ यांच्या त्या वक्तव्याला दिग्विजयसिंह यांनी प्रत्युत्तर दिले. हा दिग्विजयसिंह आतापर्यंत अनेकदा विष प्यायला आहे. तो आणखी एकदा विष घेईल. पण आपण मोठे नेता असल्यावर संयमित प्रतिक्रिया दिली पाहिजे, असा टोला त्यांनी कमलनाथ यांना हाणला. त्या त्यानंतर कमलनाथ यांनी पुन्हा एकदा दिग्विजय सिंह यांना आणखी विष घ्यावेच लागेल, असे प्रत्युत्तर दिले.
यातून मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या दोन दावेदारांचा उभा दावा समोर आला. ही काँग्रेस आता भाजपच्या सरकारशी टक्कर घेऊन पूर्ण बहुमत आणण्याचे भाषा करत आहे, पण त्या भाषेची उपांत्य भाषा म्हणून कपडे फाडणे आणि विष पिणे या भाषेत एकमेकांचे वाभाडे काढले जात आहेत.
अर्थात कपडे फाडणे ही भाषा कमलनाथ यांच्यासाठी नवीन नाही. 2019 मध्ये ते छिंदवाडा मधून विधानसभेची पोटनिवडणूक लढवत असताना एका प्रचार सभेत आपला मुलगा नकुल नाथ याने लोकांची कामे केली नाहीत, तर त्याचे कपडे फाडावेत, असे वक्तव्यही कमलनाथ यांनी त्यावेळी केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App