मी मनोज जरांगेंचं काय खाल्लं??; पण जरांगे सध्या कुणाचं खात आहेत??; भुजबळांचे बोचरे सवाल

प्रतिनिधी

नाशिक : अंतरवली सराटीतल्या गरजवंत मराठा आरक्षण सभेतून मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ आणि गुणवंत सदावर्ते यांना टार्गेट केल्यानंतर छगन भुजबळ यांनी नाशिक मधून मनोज जरांगेंना बोचरे सवाल केले आहेत. मनोज जरांगेंचा माझ्यावर एवढा राग का?? मी त्यांचं काय खाल्लं?? पण आता तेच मनोज जरांगे नेमकं कुणाचं खात आहेत??, असे बोचरे सवाल छगन भुजबळ यांनी केले.Chagan bhujbal targets manoj jarange patil over his secret political affiliations

जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनाज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेतून मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारताना मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. याला आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले.



मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला. मी अजितदादा पवार यांना आवाहन करतो की, छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला.

त्यांच्या या टीकेला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिले. महाराष्ट्रात ओबीसी 54 % पेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला वेगळे आणि टिकणारे आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांचे मी काय खाल्ले आहे??, हे त्यांनी सांगावे. आता मनोज जरांगे पाटील कुणाचे खात आहेत, हे ही त्यांनी सांगावे, असे आव्हान छगन भुजबळांनी दिले.

मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. एकदा नाही. तर अनेकवेळा धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. तू जिवंत राहणार नाही. तुझी वाट लावू अशी धमकी देते आहेत. शिव्याही दिल्या जात आहेत. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाहीत. पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याचं काय ते पुढे बघतील, असेही छगन भुजबळ म्हणाले.

शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाज कार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठं केलं, असं सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलं. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केलं आहे. माझं देखील काहीतरी योगदान आहे. म्हणूनच मला संधी दिली गेली असेल. माझा माझ्या समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे, असे.ई छगन भुजबळ म्हणाले.

मी एका जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. तर संपूर्ण ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतो. ओबीसी समाजासाठी काम करतो. महादेव जानकर यांनी मला समर्थन दिले आहे. मी त्यांचा आभारी आहे. सध्या तरी ओबीसी बचाव हे एकच आमचं काम आहे, अशी पुस्ती भुजबळांनी जोडली.

Chagan bhujbal targets manoj jarange patil over his secret political affiliations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात