
वृत्तसंस्था
कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात जातीभेद विरोधाचे नाव देऊन प्रत्यक्षात हिंदू विरोधी कायदा संमत करणाऱ्या विधेयकाला कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी आपल्या अधिकारातला नकाराधिकार अर्थात व्हेटो वापरून रोखले.California governor vetoes bill to ban caste discrimination
SB-403 हे विधेयक कॅलिफोर्निया राज्याच्या विधिमंडळाने मार्च 2023 मध्येच संमत केले होते हिंदू धर्मातील विशिष्ट प्रथा परंपरा या भेदभाव करणाऱ्या आहेत, असा दावा करून संपूर्ण हिंदू धर्मालाच बदनाम करण्याचे काम या विधेयकात करण्यात आले होते. हिंदूंच्या धार्मिक प्रथा भेदभाव करणाऱ्या आहेत असे अत्यंत चलाखीने या विधेयकात सूचित करण्यात आले होते. या विधेयकाची सर्व भाषा भेदभाव विरोधाची होती, पण ती हिंदू धर्म आणि दक्षिण आशियाई हिंदू समाज यांच्या विषयी प्रचंड गैरसमज निर्माण करणारी होती. त्यामुळे अमेरिकन हिंदू फाउंडेशनने या विधेयका विरोधात कॅलिफोर्निया राज्यात मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी आपल्या अधिकारातील नकाराधिकार अर्थात भेटू वापरून SB-403 हे विधेयक रोखले.
कॅलिफोर्निया राज्यामध्ये आधीच लिंग, वंश, रंग, धर्म, राष्ट्रीय मूळ, विकलांगता, लैंगिक ओळख अथवा लैंगिक झुकाव त्याच बरोबर अन्य आधारांवरचे भेदभाव रोखणारे कायदे आधीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्यासाठी कोणत्याही नव्या कायद्याची गरज नाही. म्हणून आपण SB-403 नावाने ओळखल्या जाणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी करत नाही तर व्हेटो वापरतो, असे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी स्पष्ट केले.
गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी SB-403 विधेयक भेटो वापरून रोखल्याबद्दल हिंदू अमेरिकन फाउंडेशनने HAF समाधान व्यक्त केले आहे. संबंधित विधेयकात हिंदू धर्माला भेदभावी ठरविण्याची चलाख भाषा वापरण्यात आली होती. त्यातून हिंदू प्रथा परंपरा बदनाम तर होत होत्याच, पण त्या पलीकडे जाऊन कॅलिफोर्निया मध्ये दक्षिण आशियातील नागरिकांवर अनावश्यक संशय निर्माण होऊन त्यांच्याविषयीच भेदभाव निर्माण होत होता. संबंधित विधेयक तयार करताना त्यासाठी बनावट जात सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला होता. त्यातून कॅलिफोर्नियातल्या दक्षिण दक्षिण आशियाई नागरिकांचे हक्क हिरावले जात होते. मात्र आता SB-403 हे विधेयक रोखल्याने कॅलिफोर्निया नवा भेदभाव तयार होऊ शकणार नाही. त्याचबरोबर समतेच्या तथाकथित लॅबोरेटरीतून निघालेले हिंदू धर्माच्या बदनामीचे षडयंत्र उद्ध्वस्त केले जाईल, असा विश्वास हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे प्रमुख समीर कालरा यांनी व्यक्त केला.
अमेरिका हा कोणत्याही प्रकारचा भेदभाव सहन न करणारा देश आहे तो तसाच राहावा आणि सर्वांचे सहजीवन अधिक संपन्न व्हावे. यात नवा भेदभाव ही तयार होऊ नये, अशी भावना कालरा यांनी व्यक्त केली.
California governor vetoes bill to ban caste discrimination
महत्वाच्या बातम्या
- बंगळुरूमध्ये भीषण दुर्घटना, फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू
- Earthquake : अफगाणिस्तानमध्ये ३० मिनिटांत ३ शक्तिशाली भूकंप, १४ मृत्यू, ७८ जखमी
- दहशतवादी रिझवान अश्रफचे ‘सपा’ नेत्याशी आढळले कनेक्शन, तपास यंत्रणांनी छापेमारी सुरू केली
- Asian Games 2023 : भारताने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास, आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक
Array