मध्य प्रदेशात भाजपचे 78 उमेदवार जाहीर होऊनही काँग्रेसमध्ये मात्र अजून चर्चेचेच गिरमिट!!

  • 7 – 8 दिवसानंतर कदाचित अंतिम फैसला; कमलनाथ यांची माहिती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुका अजून अधिकृतरित्या जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी भाजपने तब्बल 78 उमेदवार जाहीर केले आहेत, तरीदेखील काँग्रेस अजून चर्चेच्या गिरमिटमध्ये अडकली आहे. उमेदवारांबाबत काँग्रेसचा कोणताही अंतिम फैसला अद्याप झालेला नाही. madhya pradesh vidhansabha election 2023

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होणे अपेक्षित आहे. तरीदेखील भाजपने 3 केंद्रीय मंत्री, 7 खासदार यांच्यासह पहिल्या दोन टप्प्यांमध्ये 78 उमेदवार जाहीर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, फग्गनसिंह कुलास्ते आणि प्रल्हाद सिंह पटेल यांना भाजपने विधानसभा निवडणुकीची तिकिटे देऊन रणमैदानात उतरवत मध्य प्रदेशात फार मोठ्या फेरबदलाची चुणूक दाखवली आहे.

पण विरोधात बसलेल्या काँग्रेसमध्ये मात्र अजून चर्चेचेच गिरमिट सुरू आहे. मध्य प्रदेश काँग्रेस समितीची आज काँग्रेस हायकमांड समवेत दिल्लीत चर्चा झाली, पण त्यामध्ये कोणताही अंतिम फैसला झाला नाही. विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी 125 ते 130 जागा संदर्भात प्राथमिक चर्चा झाली. या पलीकडे काहीही होऊ शकले नाही. ही माहिती माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी पत्रकारांना दिली. येत्या 7 – 8 दिवसांत उमेदवारांची नावे कदाचित जाहीर होतील, असे ते म्हणाले.

कमलनाथ यांच्या वक्तव्यामधून ज्या बाबी स्पष्ट झाल्या, त्यानुसार मध्य प्रदेशात 234 जागा असताना फक्त निम्म्याच जागांवर काँग्रेसमध्ये चर्चा झाली, ती देखील प्राथमिक अवस्थेत!! उमेदवारांची नावे एकमेकांना देण्यापलीकडे त्यात काहीच घडले नाही. 7 – 8 दिवसांनंतर म्हणजे शारदीय नवरात्र सुरू झाल्यानंतर काँग्रेसची बैठक होऊन त्यात अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.

तोपर्यंत भाजपाच्या आणखी 2 – 3 याद्या येऊन कदाचित सर्व 234 उमेदवार जाहीर केलेही जातील. यापैकी पहिले 78 उमेदवार तर आधीच जाहीर केले आहेत. त्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची गोगलगाय गती ठळकपणे समोर येते आहे. या गोगलगाय गतीतून काँग्रेस भाजपशी टक्कर घेण्याचा मनसुबा राखून आहे.

madhya pradesh vidhansabha election 2023

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात