”उद्धव ठाकरे जनाची नाही मनाची असेल तर…” चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात!

BAWANKULE AND THAKREY

”…हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार!” असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात नांदेड, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या मृत्यूंच्या घटनांवरून राजकीय वातावरण तापत आहे. या मुद्य्यावरून विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत राज्य सरकारवर टीका केल्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे यांनी त्यांना  प्रत्युत्तर दिले आहे.  BJP state president Chandrashekhar Bawankule has responded to Uddhav Thackerays criticism

चंद्रेशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, ”उद्धव ठाकरे जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, आक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. उद्धव ठाकरे, तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं. मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?”
याशिवाय ”मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? मुख्यमंत्री घरात का बसले? असं कोण विचारतंय तर ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर सरकार चालवलं ते उद्धव ठाकरे! उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तुम्ही नांदेडला जाणार का? तर त्यावर ते म्हणतात मी कशाला जाऊ? माझा पक्ष चोरलाय, माझं पद गेलं. म्हणजे पदावर असताना घरी बसायचं. पद गेल्यावरही घरात बसून पत्रकार परिषद घ्यायची आणि स्वतः काही करायचं नाही हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार! उद्धव ठाकरे, तुमचे सरकार असताना कोविड काळात जे घोटाळे झाले त्याबद्दल कधी तरी बोलणार की नाही?”  असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ? – 
 “कोरोना काळात कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. आज दुसरी कोणतीही साथ नाही, आज साथ आहे ती भ्रष्टाचाराची साथ आहे. आरोग्य खात्याचं पोस्टिंगचंही रेट कार्ड ठरवलं गेलंय असं कानावर येतंय. औषधं खरेदीसाठीही निविदा प्रक्रिया बंद होणार आहे. मग हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणार? निविदा प्रक्रिया बंद करून भ्रष्ट्राचाराचं दार उघडं केलं जातंय. आज सुद्धा जिथे जिथे औषधं खरेदी झालेली नाही तिकडे कोणाचे दलाल बसले आहेत का याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे”, असं म्हणत आरोग्य खात्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला आहे.

BJP state president Chandrashekhar Bawankule has responded to Uddhav Thackerays criticism

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात