टेबल टेनिस मधले चीनचे वर्चस्व मोडीत; भारतीय महिलांचे पदक निश्चित!!

वृत्तसंस्था

होंगजू : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने टेबल टेनिस मधले चीनचे अनेक दशकांचे वर्चस्व मोडून काढत आपले पदक निश्चित केले. टेबल टेनिस क्रीडा प्रकारात चीनचे गेले कित्येक दशके वर्चस्व आहे. Break China’s dominance in table tennis

आशियाई देशांमध्ये चीन, इंडोनेशिया, जपान या देशांमध्येच नेहमी टेबल टेनिस मध्ये वर्चस्वाची स्पर्धा राहिली आहे, पण आता त्यात भारताने प्रवेश केला आहे आणि भारतीय महिलांनी चिनी महिलांचा पराभव करून आशियाई उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे त्यांचे पदक निश्चित झाले आहे.

उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या आहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी या जोडीने जागतिक क्रमवारी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या वांग यिदी आणि चेन मेंग या जोडीचा 11 – 5, 11 – 5, 5 – 11, 11 – 9 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीतल्या दुसऱ्या जोडीला भारतीय जोडीने पराभूत केल्याने चीनला मोठा धक्का बसला.

आजच भारताने मिक्स्ड डबल टेनिस मध्ये सुवर्णपदक पटकाविले. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनीही कामगिरी केली, तर भारतीय क्वाश टीमने पाकिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले. त्या पाठोपाठ भारतीय जोडीने महिलांच्या जोडीने चिनी जोडीचा पराभव करत टेबल टेनिस मधल्या वर्चस्वाला धक्का दिल्याची आनंदाची बातमी आली. त्यामुळे भारतीय चमूत प्रचंड उत्साह पसरला आहे.

Break China’s dominance in table tennis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात