‘सध्या आघाडीचे नाव बदलले आहे, लवकरच राहुल गांधीही…’ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे विधान

सनातनविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना हाकलून देणे गरजेचे आहे, असंही सावंत म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान जुलवानिया परिसरात आयोजित सभेला संबोधित करताना त्यांनी INDIA आघाडी आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. ”सध्या आघाडीचे नाव बदलले आहे, लवकरच राहुल गांधींनीही आपले नाव बदलले तर ते जिंकू शकतील का?, नाव बदलल्याने हेतू बदलत  नाही.” असं ते म्हणाले. In Madhya Pradesh Chief Minister Pramod Sawant criticizes India Aghadi and Rahul Gandhi

प्रमोद सावंत म्हणाले की, ”भाजपाला विरोध करणाऱ्या पक्षांनी नावे बदलली आहेत, मात्र हेतू तोच आहे. विरोधी आघाडीतील पक्षाच्या नेत्याचा मुलगा सनातन धर्म संपुष्टात आणण्याची भाषा करतोय आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांचा मुलगा त्याला पाठिंबा देत आहे, यावरून त्यांचा हेतू दिसून येतो. सनातनविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना हाकलून देणे गरजेचे आहे.”

याचबरोबर विरोधकांबाबत प्रमोद सावंत म्हणाले की, आपल्यासारख्या मंत्रिमंडळाची आणि कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्याकडे नाही. काँग्रेस सरकारच्या ५० वर्षात कोणताही विकास झाला नाही आणि आज भाजप सरकारने १० वर्षात काय केले ते सर्वांना स्पष्टपणे दिसत आहे. मध्य प्रदेशात ५ लाख किलोमीटरचा रस्ता नव्याने बांधण्यात आला आहे. मध्य प्रदेशला सर्वाधिक निधी मिळाला आणि सरकारने खूप चांगला विकास केला.

In Madhya Pradesh Chief Minister Pramod Sawant criticizes India Aghadi and Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात