वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सनातन धर्म मलेरिया, डेंगी आणि कोरोना सारखा आहे. त्याचे निर्मूलन केले पाहिजे, अशी अश्लाघ्य टीका तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचा पुत्र उदयनिधी याने केली होती. त्यावर अनेकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री करण सिंह हे देखील उदयनिधीवर जोरदार बरसले आहेत. Congress leader Karan Singh lashed out at Udayanidhi for criticizing Sanatan Dharma
भारतात आणि भारताबाहेर महान सनातन धर्माचे करोडो अनुयायी आहेत. त्यांच्या धर्मश्रद्धा उत्कट आहेत. त्यावर उदयनिधींनी प्रहार करणे याचा मी निषेध करतो. ज्या तामिळनाडूत उदयनिधी राहतात, त्याच तामिळनाडूमध्ये सनातन धर्मियांची पूजनीय अशी शेकडो मंदिरे आहेत. रामेश्वर, सुचिंद्रम, चिदंबरम या ठिकाणी जागतिक कीर्तीची मंदिरे आहेत. येथे करोडो भाविक दर्शनासाठी येतात करोडोंच्या श्रद्धा आणि प्रेरणा सनातन धर्माशी जोडल्या गेल्या आहेत. त्या सनातन धर्माला अत्यंत अश्लाघ्य शब्दांत संबोधणे पूर्ण निषेधार्ह आहे, अशा शब्दांमध्ये करण सिंह यांनी उदयनिधी स्टालिन यांच्यावर शरसंधान साधले आहे.
करण सिंह यांनी उदयनिधीवर शरसंधान साधले असले तरी तामिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अळगिरी यांनी मात्र उदयनिधीच्या बेताल वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतल्या काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यातले मतभेद समोर आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App